नागपूर अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


नागपूर : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी बंटी उर्फ राहुल विनोद राऊत (२७) याला नागपूर न्यायालयाने २० वर्षाच्या करावासाची शिक्षा सुनावली आहे. लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्याचे न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी आरोपीला ही शिक्षा सुनावली.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, प्लॉट क्रमांक 38, त्रिमूर्ती नगरच्या बाजूला असलेल्या भुजबळ नगर येथील एनआयटी गार्डनजवळ राहणाऱ्या बंटी राऊत याने 24 जुलै 2017 रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घरी परतत असताना 14 वर्षीय मुलीचे अपहरण केले. यानंतर मुलीला बागेत नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

या घटनेनंतर पीडित तरुणीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार राणा प्रताप नगर पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 363,342,376(d) नुसार, PoCSO कायद्याच्या कलम 4 आणि 8 नुसार आरोपी बंटी राऊत विरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर 29 जुलै 2017 रोजी पोलिसांनी राऊतला अटक केली. या प्रकरणाच्या तपास अधिकारी असलेल्या पीएसआय शीतल चामले यांनी प्रकरणाच्या तपासानंतर वैद्यकीय अहवालासह दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. याप्रकरणी बंटी राऊतवर आरोप सिद्ध झाल्यामुळे, न्यायालयाने आयपीसीच्या कलम 376(डी) नुसार त्याला सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच यासोबतच 10 हजार रुपये दंडही ठोठावला. जर आरोपी राऊत याने दंड भरला नाही तर त्याला अतिरिक्त एक वर्ष कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने सुनावणीदरम्यान सांगितले.

दरम्यान न्यायालयाने बंटी राऊत याने केलेल्या गुन्ह्यांसाठी आयपीसीच्या कलम 363 आणि 342 अंतर्गत अनुक्रमे 3000 रुपयांच्या दंडासह तीन वर्षे RI आणि 1000 रुपयांच्या दंडासह सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. राज्यातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अॅड आसावरी पालसोडकर यांनी बाजू मांडली तर अ‌ॅड .एस.एस.मेश्राम हे बचाव पक्षाचे वकील होते.