मराठा समाजाच्या अंतिम हितासाठी ५० टक्के आत की बाहेर ? आरक्षण मंथन परिषद घ्या !

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मराठा समाजाच्या अंतिम हितासाठी
५० टक्के आत की बाहेर ? आरक्षण मंथन परिषद घ्या !

मुंबई : मराठा समाजाचा अनुक्रमांक ८३वर समावेश करावा ही मागणी व त्या साठी सर्व पुरावे संकलन जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी स्व.वसंत नरवडे पाटील विरूद्ध सरकार या प्रकरणातील पुरव्या साठी केले होते.पुढे तेच न्यायमूर्ती खत्री आयोग,न्यायमूर्ती बापट आयोग, न्यायमूर्ती सराफ आयोग,न्यायमूर्ती भाटिया आयोग आदी सर्वा कडे दाखल केलेले होते.परंतु मराठा मागासवर्ग असल्याचे आयोग मान्य करीत नव्हता.त्यांचा हा लढा अजुनही सुरूच आहे,फक्त क्रमवारी परिस्थिती मुळे बदलली आहे एवढेच फरक म्हणून आहे.
*राज्य भरात सध्या ५० टक्के आत की बाहेर ? हा विचार व चर्चा अग्रस्थानी असुन* सर्व सामान्य मराठा बांधवांचा विचार व सल्ला घेउन मराठा समाजाच्या अंतिम हितासाठी तात्काळ राज्यस्तरीय आरक्षण मंथन परिषद घ्या असे कळकळीचे आवाहन अखंड भारत मराठा साम्राज्य चे प्रमुख रामचंद्र शेडगे सातारा मुंबई, प्रकाश भाऊ जगताप सातारा, संतोष दळवी पुणे,दत्ता शेळके मुंबई सोलापूर,संतोष चव्हाण पुणे,श्रीपाद पाटील सपकाळ सातारा,शिवाजीराव पाटील जालना, विलासराव देसाई मुंबई कोल्हापूर,शुभम चावरे कोल्हापूर, शुभम शिंदे सांगली,राजेश देशमुख नाशिक,शिवाजीराव चव्हाण छत्रपती संभाजीनगर, खवाले पाटील आदींनी केले आहे.
मराठा कुणबी एकच असल्याचे प्रमाण पुरावे त्यांनी खुप पूर्वीच म्हणजे बहुसंख्य मंडळी आरक्षण मागणीवर हसत होते किंवा शाळेत शिकत होते ते समाजाच्या माहितीस्तव नव्याने सादर करीत आहोत असे नमुद न करता इथेही अनितीचा वापर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जात आहे.
अगदी अनेक व्यक्तींना सुद्धा त्या काळी निवेदन द्यायचे होतें ते सुध्दा स्व:त जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी लिहून दिले टाईप करुन दिले होते. म्हणूनच त्या निवेदनात सुद्धा त्यांचेच नावं अग्रस्थानी लिहलेले आहे. ” मराठा व कुणबी ” एकच असल्याबद्दलचे इतर पुरावे असे की,काशीराव बापुजी देशमुख यांनी १९२७ मध्ये लिहिलेल्या “ क्षत्रियांचा प्राचीन इतिहास” या ऐतिहासिक ग्रंथात मराठा व कुणबी हे एकच असल्याचे स्पष्ट केले आहे. एक कुणबी युवतीचे लग्न मराठा समाजातील व्यक्तीशी झाल्याने हा खटला उभा झाला होता. त्यावेळच्या न्यायाधीशांनी हा विवाह कायदेशीर ठरवीत मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट केले.“कुलंबीज” या संस्कृत शब्दापासुन कुळंबी हा शब्द आला. कुळंबीचा अपभ्रंश होत कुणबी शब्द रुढ झाल्याचा दावा केला आहे. यासाठी हंटर्स स्टॅटिस्टिकल अकाउंट ऑफ बेंगाल व्हॉल्युम ११ या खंडाचा संदर्भ दिला आहे.बॉम्बे गॅझेटिअर्स, सातारा खंड १९ च्या पान क्र.७५ वर मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट केले आहे.१८८१ च्या जनगणनेत मराठ्यांना कुणबी जातीमध्ये समाविष्ट केल्याचे गॅजेटिअर मध्ये नमूद केले आहे.
मुंबई गॅझेटियर बेळगाव खंड २१, मुंबई गॅझेटियर खंड ९, मुंबई गॅझेटियर पुणे भाग १८ तसेच १८८१ च्या सी पी अँड बेरार जनगणना अहवालातही मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट केले आहे.खामगाव येथे २९ डिसेंबर १९१७ रोजी मराठा शिक्षण परिषद आयोजित केली होती. या परिषदेने मराठा हे कुणबीच असल्याचे स्पष्ट केलेले आहे.महात्मा फुलेंच्या १८८३ मधील “ शेतकऱ्यांचा आसुड” पुस्तकात फुलेंचा व एका खासा मराठा म्हणवुन घेणाऱ्या व्यक्तीचा संवाद दिला आहे. त्याच्याआधारे सुद्धा मराठा हा कुणबीच असल्याचे सिद्ध करता येते.
या सर्व ऐतिहासिक, न्यायालयीन व इंग्रजांच्या विविध गॅझेटियर्स वरुन मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट होत आहे.आता प्रश्न असा पडतो की,राज्य शासनाला हे सर्व जात प्रमाण पत्र देताना अनेक कायदेशीर व घटनात्मक बाबींचा संदर्भ देऊन अशी जात प्रमापत्रासाठी १९६७ सालीचा जात प्रमापत्रासाठी असलेली नियम शिथिल करावे लागतील परंतु असा निर्णय फक्त मराठवाडा भागासाठीच घेता येतील. प्रश्न आहे की,जात प्रमाणपत्र काढण्या साठी आवश्यक पुरावेच नाहीत असते तर प्रमाणपत्र मिळालेच असते. मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सामील होण्यापुर्वी इतर मागावर्गीयां साठी असलेल्या आरक्षण यादीत होता आणि तोच जुना मान्य केलेला जातीचा दर्जा दिला जाईल हे संयुक्त महाराष्ट्रात सामाविष्ट होतांना मान्य केले होते.
*महाराष्ट्राचा विचार केल्यास सर्वोच्च न्यायालयातील पुनर्विचार याचिकेच्या प्रसंगी क्यूरेटिव पीटिशन च्या निर्णया शिवाय राज्य शासनास आरक्षणा बाबत काही एक दिशा निश्चीत करता येणार नाही कारण यातील पुनर्विचार याचीकेत अनेक केस लॉ सामाविष्ट केल्या शिवाय पुनर्विचार याचिका मंजुर होणार नाही.या साठी सुद्धा जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील अत्यंत उपयुक्त असे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन राज्य शासनासाठी तयार केलेली असुन त्याचा निश्चीत असा उपयोग पुनर्विचार याचिके साठी होणार आहे हे सगळे संकलन समाज बांधवां सामोर सादर करणे आवश्यक आहे अशीच बाब ५०टक्के आतील आरक्षणाच्या मागणी बाबत असुन हा विषय मांडणी करणाऱ्या समाज बांधवांना सुद्धा संधी यातुन प्राप्त होणार असुन हे सर्व क्रमप्राप्त आहे.आणि हे काहीच जर करायचे नसेल तर मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने एस ई बी सी आरक्षण रद्द करतांना निरीक्षण नोंदवले होते की,मराठा समाजाचे मागासपण नव्याने सिद्ध केल्या शिवाय राज्य शासनाला आरक्षण देता येणार नाही आणि ही सर्व करण्यासाठी परत एकदा राज्य शासनास आयोगाची नियुक्ती करून मराठा समाज हा शैक्षणीक व समाजीक दृष्ट्या मागास असल्याचा अहवाल प्राप्त करावा लागेल व त्यास मंत्री मंडळाची मंजुरी घेउन विधान सभा व विधान परिषदेची दोन तृतीयांश बहुमताने मंजुरी घेउन कायदा तयार करावा लागेल व तसा अध्यादेश काढावा लागेल. या साठी २०२४ च्या निवडणुका संपलेल्या असतील आणि तो पर्यंत सत्तेत एक तर भाजपा असेल किंवा महाविकास आघाडी असेल, अडचण तीच परत येणार आहे की, या सगळ्यांनी सत्तेत येण्यापूर्वीच स्पष्ट केले होते की,आम्ही कोणा च्याही आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देऊ.आता सगळ्यांनाच गांभीर्याने विचार करावा लागेल की, जर आपल्या बाजूने एकही राजकीय पक्ष नाही तर मग ५०%आतील आरक्षण कसे मिळेल ? कोणत्या समाजाचे आरक्षण कमी केल्या जाणार ? आणि हे कमी न करता जर आरक्षण बहाल केल्या गेले तर मग परत आपल्याला इंद्रा सहानी प्रकरणातील ५०% मर्यादा आडवी येईल ?मग कसे व कोण आरक्षण देणार* ?

काही लोकांना विनाकारण ट्रोल केल्या जात असुन भाडोत्री सुद्धा म्हटले जात असुन ही ट्रोलींग सतत करणे ही बाब समाजा मध्ये फूट पाडण्याचा डाव असुन समाजाने तो उधळून लावण्या साठी “बाप दाखव नाही तर श्राद्ध कर ” ही भुमिका हाती घेणे पर्याप्त झाले आहे.
खरे पहाता उत्तर नसलेला प्रश्न आहे काय ? आणि नसेल तर मग मराठा समाजाच्या हिता साठी काही पर्यायी मार्गाचा अवलंब आपण करणार आहे की नाही ? म्हणून आता ” आरक्षण ५०% च्या आत ? की ५०% च्या बाहेर ? ” या विषयावर दोन्ही बाजूचे फक्त निमंत्रीत वक्ते बाजु मांडतील तरच योग्य व कायदेशीर बाब असलेली मागणी पुढे करता येईल.म्हणून सर्व समाज बांधव असलेल्या मराठा क्रांती मोर्चाची ” राज्यव्यापी आरक्षण मंथन परीषद ” घेउन अंतीम निर्णय घ्यावा असे आवाहन अखंड भारत मराठा साम्राज्य चे प्रमुख रामचंद्र शेडगे सातारा-मुंबई, प्रकाश भाऊ जगताप सातारा, संतोष दळवी पुणे,दत्ता शेळके मुंबई सोलापूर, संतोष चव्हाण पुणे,श्रीपाद पाटील सपकाळ सातारा, शिवाजीराव पाटील जालना,विलासराव देसाई मुंबई कोल्हापूर,शुभम चावरे कोल्हापूर, शुभम शिंदे सांगली,राजेश देशमुख नाशिक,शिवाजीराव चव्हाण छत्रपती संभाजीनगर, खवाले पाटील विधिज्ञा सुवर्णा मोहिते, विकिराज पाटील, योगेश बहादुरे, उमेश पाटील आदींनी केले आहे.
*महत्वाचे संकलन जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी स्व.वसंत नरवडे पाटील विरूद्ध सरकार या प्रकरणा साठी* *केले होते आणि न्यायमूर्ती खत्री आयोग, न्यायमूर्ती बापट आयोग, न्यायमूर्ती सराफ आयोग, न्यायमूर्ती भाटिया आयोग आदी सर्वा कडे यातील बहुसंख्य पुरावे दाखल केलेले आहेत. त्यांचा हा लढा अजुनही सुरूच आहे,फक्त क्रमवारी सध्याच्या परिस्थिती मुळे बदलली आहे एवढेच आहे. मराठा कुणबी एकच असल्याचे अत्यंत अभ्यासु प्रमाण पुरावे त्यांनी खुप पूर्वीच म्हणजे बहुसंख्य मंडळी आरक्षण मागणीवर हसत होते तेंव्हा केलेले असुन ही बाब खर तर समाज माध्यमांवर हे सगळे प्रसिद्ध करतांना सन्मानाने नमुद करावयास पाहीजे किंवा तेच संकलन आम्हीं मराठा समाजाच्या माहिती साठी सादर करीत आहोत असे नमुद न करता इथेही त्यांनी वेगळ्याच नितीचा वापर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे*.
अगदी अनेक व्यक्तींना सुद्धा त्या काळी निवेदन द्यायचे होते ते सुध्दा स्व:त जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी लिहून दिले तसेच टाईप करुन दिले होते आणि या साठी अभ्यासच आवश्यक असतो म्हणूनच त्या निवेदनात सुद्धा त्यांचेच नावं साधारणता अग्रस्थानी लिहलेले असायचे.असो हे होतच असते. उलट त्यांचे समाज बांधवांसाठी साठी ” मराठा आणि कुणबी एकच ” असल्याचे कायदेशीर पुरावे अत्यंत उपयुक्त ठरणारे असुन मराठा आणि कुणबी एकच असल्याचे असंख्य पुरावे देता येतील. वास्तविक पाहता मराठा व कुणबी या दोन्ही भिन्न जाती नसून एकच आहे.सन१८८१ पासून १९३१ पर्यंतच्या ५० वर्षाच्या गॅझेट मध्ये मराठा हा कुणबी असल्याचा उल्लेख केला जातो.पुरावा१. १९८१ च्या जनगणनेत मराठ्यांचा कुणब्यां मध्ये समावेश केला होता. बॉम्बे गॅझेटीयर पृष्ठ ७५,पुरावा २ – मराठा व कुणबी यांचा समावेश कुणबी ह्या शब्दात होतो. या दोघांमध्ये भेद दर्शविणे कठीण आहे. या दोघां मध्ये परस्पर रोटी व बेटी व्यवहार चालतो.पुरावा- गॅझेटीयर ऑफ इंडियाच्या तत्कालीन औरंगाबादचा पान क्रमांक २९३ मध्ये जामीन कसणारा म्हणजे कुणबी असे नमुद असुन गॅझेटीयर वर्धा जिल्ह्याच्या पान क्रमांक १४८ मध्ये कुणबी म्हणजे मराठा समाजातील जमीन कसणारा वर्ग होय तर सर्व मराठा शेतकरी कुणबी आहेत हे स्पष्ट होत असून गॅझेटीयर नागपुर मध्ये कुणबी हे परंपरागत व्यवसायाने शेतकरी आहेत व या सर्व संदर्भा द्वारे हे सिद्ध होते की, शेती करणारा मराठा म्हणजेच “कुणबी” आहे. म्हणुन महाराष्ट्रातील सर्व शेती करणाऱ्या मराठ्यांना “कुणबी” या जातीने ओळखले जावे.
जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी महत्वाची बाब त्या वेळी प्रचंड अभ्यास करुन पुढे आणली होती की एफ ई.इंथोवेन यांनी त्यांच्या मुंबईच्या जाती व जमाती खंड-३ या पुस्तकात ‘कुणबी’ या नावाखाली येणाऱ्या जातींचे विश्लेषण केले आहे ते असे त्यात मराठा कुणबी म्हणजे शेती करणारे मराठा यांचा समावेश या वर्गात होतो. यांनाच कुळवाडी असे म्हणतात.इंपिरियल गॅझेटीयर महाराष्ट्र हा पुरावाआहे तर तत्कालीन हैद्राबाद संस्थानाने प्रसिद्ध केलेले गॅझेटीअर मध्ये सुद्धा असाच उल्लेख असुन अगदी जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती समाज कल्याण, म.रा.पुणे यांनी त्यांच्या दिनांक १६-१२-९६ च्या कांताबाई इंगोले आणि बा.द. पाटील पुणे यांचा दि. ०९-१२-९६ चा निकाल म्हणतो की,या दोन्ही निर्णयात शेती करणारा मराठा म्हणजे कुणबी असा निर्णय दिला आहे. हा निर्णय सर्वांसाठी कायदेशीर व न्यायालयीन बाबी कटाक्षाने तपासूनच निर्णय राज्य शासनास घ्यावा लागेल.
अत्यंत महत्वाचा प्रश्न एकच आहे आणि तो म्हणजे ज्यांच्या टी सी वर हिंदु मराठा आहे त्यांचे काय ?