ताज्या बातम्यापुणेमहत्वाचेमहाराष्ट्र

दहावी, बारावीत मोठा बदल, कठीण विषयांवर काढला तोडगा..


पुणे :दहावी, बारावीत मोठा बदल होणार आहे. या बदलामुळे शिक्षण क्षेत्रात क्रांती होणार आहे. विद्यार्थ्यांना कठीण वाटणाऱ्या विषयांची भीती जाणार आहे.कारण त्यावर जालीम तोडगा काढला आहे. तसेच परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार आहे. नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क तयार करणार्‍या तज्ज्ञ समितीने असे अनेक बदल सुचवले आहे. यासंदर्भात जनतेच्या सूचना मागवण्यात आल्या आहेत. या पद्धतीने बदल झाल्यास परीक्षेचे स्वरूप अन् बरेच काही बदलणार आहे. हे सर्व पुढील वर्षापासून लागू होणार आहे.

नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्ककडून चार पद्धतीन करिकुलम फ्रेमवर्क तयार करण्यात येणार आहे. त्यात शालेय शिक्षण, प्राथमिक शिक्षण, शिक्षण प्रशिक्षण आणि उच्च शिक्षणाचा समावेश आहे. एनसीएफचे अध्यक्ष डॉ.कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती यासंदर्भात कार्य करत आहे.

काय होणार बदल

१२वी बोर्ड परीक्षा दोन टप्प्यांत
१०वी-१२वीच्या निकालात आधीच्या वर्गातील गुण जोडण्याची शिफारस
विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेचे विभाजनही संपुष्टात येणार.
बोर्ड परीक्षा दोन टप्प्यांत घेण्यात येणार
नवे फ्रेमवर्क २०२४-२५ पासून लागू होईल.
बारावी बोर्ड परीक्षा देताना 16 विविध अभ्यासक्रमांचे कोर्स
विद्यार्थी आपल्या आवडीचे अभ्यासक्रम निवडून शकणार
कधी कधी झाला बदल

आतापर्यंत १९७५, १९८८, २००० आणि २००५ मध्ये करिक्युलम फ्रेमवर्क बनले गेले होते. परंतु बोर्ड परीक्षांच्या स्वरूपात बदल करण्यात आली नाही. यापूर्वी २००९ मध्ये दहावीसाठी समग्र मूल्यांकन पद्धती लागू केली होती, पण २०१७ मध्ये ती रद्द केली.

सेंकडरी स्टेज चार वर्षांचा

आराखड्यानुसार सेंकडरी स्टेज चार वर्षांचा असेल. इयत्ता 9वी, 10वी, 11वी आणि 12वी असा हा टप्पा असणार आहे. यामध्ये कला आणि क्रीडा हे अभ्यासक्रमाचे अत्यावश्यक घटक असतील. विज्ञान, कला आणि मानवता (मानवता) आणि वाणिज्य या सध्याच्या प्रणालीऐवजी, विद्यार्थ्यांना प्रवाहाच्या बंधनांपासून मुक्त विषय निवडण्याचे स्वातंत्र्य असेल.

पुढील वर्षांपासून पाठ्यपुस्तके

नवीन एनसीएफनुसार या बदलानुसार पुढील वर्षीपासून पाठ्यपुस्तके सुरू होणार आहेत. यापूर्वी NEP 2020 ने शालेय शिक्षणासाठी शिफारस केल्यानुसार 5+3+3+4 अभ्यासक्रम राबण्यात आला होता. शिक्षण मंत्रालयाने ऑक्टोबर 2022 मध्ये 3-8 वर्षे वयोगटातील मुलांसाठी पायाभूत टप्प्यासाठी लाँच केले होते. त्या धोरणाच्या पुढे शालेय शिक्षणासाठी पुढील एनसीएफ तयार करण्यात येत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button