नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


जळगाव : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एक लाख रुपये घेवून महिलेवर वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

आसिफ हुसेन खान असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.

संशयित आसिफ हुसेन खान हा खासगी वाहन चालक आहे. चाळीसगाव शहरातील एका खासगी दवाखान्यात आणि एका दवाखान्याच्या पाठीमागे गेल्या दोन वर्षाच्या कलावधीत त्याने हा गुन्हा केला आहे. नैसर्गिक आणि अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला विविध कलमाखाली दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दीपक बिरारी करत आहेत.