क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

सामुहिक अत्याचार करुन निर्घृण खून


छत्रपती संभाजीनगर : ‘ते’ तिघेही अट्टल गुन्हेगार. कधी चोऱ्या करत तर कधी धाकदडपशाही करुन लुटमार. या नशेखोरांनी रस्त्याने जाणाऱ्या ३२ वर्षीय महिलेला भरदिवसा झाडाझुडपात नेत तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला, नंतर तीच्या डोक्यात दगड घालून संपविले. ही घटना दोन एप्रिलरोजी दुपारी दीड ते साडेतीनदरम्यान चिकलठाणा परिसरात असलेल्या मोतीवाला कॉलनीजवळ विमानतळाच्या भिंतीलगत घडली.



तिघा आरोपींनी महिलेस निर्वस्त्र करत ओढणीने तिचे हात बांधले आणि तिने हालचाल करु नये, फरफटत जाऊ नये म्हणून हात बांधलेली ओढणी पुन्हा झाडाच्या खोडाला बांधली. नंतर तिच्यावर अत्याचार केला. ही घटना समोर येताच पोलिसांनी तत्काळ शोध घेत तीन आरोपींना अटक केली. तिघेही आरोपी हे रेकॉर्डवरील असल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय महिला ही चिकलठाणा भागात राहत होती. ती दररोज एका प्रार्थना स्थळात जात असे. तर तिचा पती हा खासगी काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होता.

२ एप्रिलरोजी महिला घरापासून काही अंतर असलेल्या प्रार्थनास्थळी गेली होती. मात्र, तब्येत खराब असल्याने ती नेहमीप्रमाणे सायंकाळी चार वाजता परत न येता दुपारी एकदरम्यान घराकडे निघाली होती. त्याचवेळी आरोपींनी तिला झाडाझुडपात नेत तिला विवस्त्र केले आणि अत्याचार केला. त्यावेळी तिन्ही आरोपींनी नशा केलेली होती.

याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय महिला ही चिकलठाणा भागात राहत होती. ती दररोज एका प्रार्थना स्थळात जात असे. तर तिचा पती हा खासगी काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होता. २ एप्रिलरोजी महिला घरापासून काही अंतर असलेल्या प्रार्थनास्थळी गेली होती.

मात्र, तब्येत खराब असल्याने ती नेहमीप्रमाणे सायंकाळी चार वाजता परत न येता दुपारी एकदरम्यान घराकडे निघाली होती. त्याचवेळी आरोपींनी तिला झाडाझुडपात नेत तिला विवस्त्र केले आणि अत्याचार केला. त्यावेळी तिन्ही आरोपींनी नशा केलेली होती.

पोलिसांची गस्तच नाही पोलिसांची गस्तच नसल्याची गाऱ्हाणी या भागातील नागरिकांनी ‘सकाळ’शी बोलताना मांडली. अनेकवेळा पोलिस येतात, मात्र ते सायरन वाजवत येतात, पोलिस व्हॅनच्या खालीही उतरत नाहीत, इतकेच नव्हे तर एकदा आल्यानंतर पुन्हा बरेचदा दिसतच नाहीत अशी कैफियत या भागातील नागरिकांनी मांडली.

तिन्ही आरोपी ‘रेकॉर्ड’वरचे

खुनाचा गुन्हा दाखल होताच तिघा आरोपींना गुन्हे शाखा, एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली. राहुल संजय जाधव (१९), प्रितम ऊर्फ सोनू महेंद्र नरवडे (२४), रवी रमेश गायकवाड (३४, रा. तिघेही ऋषीकेशनगर, बकाल वस्ती, चिकलठाणा) अशी त्या अटकेतील आरोपींची नावे आहेत.

तिघा आरोपींविरोधात एमआयडीसी सिडको, मुकूंदवाडी पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे आरोपी रवी हा तडीपारीतील आरोपी असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई निरीक्षक अविनाश आघाव, निरीक्षक गौतम पातारे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, अजित दगडखैर, पंकज मोरे, उपनिरीक्षक प्रतिभा आबूज, विरेश बने, महेश उगले, नितीश सुंदर्डे, दादासाहेब झारगड, नितीन म्हस्के, संतोष गायकवाड, देवीदास काळे यांनी केली.

आरोपींनी विवाहितेचे हात ओढणीने बांधले आणि ती ओढणी पुन्हा एका झाडाच्या खोडाला बांधली, त्यामुळे महिलेस हालचाल करता येत नव्हती. आरोपींनी अत्याचार केल्यानंतर डोके दगडाने ठेचले अन् ते तिथून पसार झाले. दरम्यान, एका नागरिकाच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर त्याने तत्काळ पोलिसांना कळविले.

नागरिकाने पाहिले तेव्हा महिला अखेरच्या घटका मोजत होती. पोलिसांनी तत्काळ महिलेस घाटीत दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. आरोपींनी पळ काढला खरा, मात्र एकीकडे पोलिसांनी महिलेस घाटीत दाखल करुन दुसरीकडे तपासाची चक्रे फिरवत आरोपींना अटक केली.

सुरवातीला याप्रकरणात २ एप्रिल रोजी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ३ एप्रिल रोजी शवविच्छेदन अहवालात महिलेवर अत्याचार केल्याचे उघड झाल्यानंतर तिघा आरोपींविरोधात अत्याचाराचाही गुन्हा दाखल केला. तिघा आरोपींना न्यायालयाने ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button