3 वर्षाच्या मुलाला सोडून प्रियकरासोबत पळून गेली महिला

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


उत्तर प्रदेश:उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एक विवाहित महिला पती आणि आपल्या तीन वर्षाच्या मुलाला सोडून प्रियकरासोबत फरार झाली.
ही घटना समोर आल्यावर सगळेच हैराण झाले. असं सांगण्यात आलं की, महिला लग्नानंतर फिरोजाबादमध्ये पतीसोबत राहत होती. पण तिच्या माहेरी शेजारील एका तरूणासोबत तिचं प्रेम प्रकरण झालं. दोघेही लपून भेटत होते. महिला जेव्हाही माहेरी जात होती तेव्हा ती प्रियकराला भेटत होती आणि जास्तीत जास्त वेळ सोबत घालवत होते.

महिला जेव्हा सासरी राहत होती तेव्हा ती तासंतास प्रियकरासोबत फोनवर बोलत होती. दोघांचं प्रेम इतकं वाढलं की, दोघांनी सोबत राहण्याचा निर्णय घेतला. मग महिला माहेरी आली आणि आपल्या तीन वर्षाच्या चिमुकल्याला सोडून गपचूप प्रियकरासोबत फरार झाली. महिलेच्या कुटुंबियांनी याची तक्रार पोलिसात केली आणि सासरच्या लोकांना सूचना दिली.

नंतर पोलिसांना दोघांचा शोध घेतला. दोघांच्या कुटुंबियांनाही बोलवण्यात आलं. तरूणीला आपल्या प्रियकरासोबत रहायचं होतं. पण तिला मुलाला सोबत ठेवायचं नव्हतं. पोलिसांसमोर त्यांच्या करार झाला. ज्यानुसार तरूणी तिच्या प्रियकरासोबत राहण्यास तयार झाली आणि मुलाला त्याच्या वडिलांकडे देण्यात आलं.

पोलिसांनी सांगितलं की, महिलेचं लग्न जवळपास चार वर्षांआधी फिरोजाबादमध्ये राहणाऱ्या एका तरूणासोबत झालं होतं. महिला अधूनमधून आपल्या माहेरी जात होती. यादरम्यान ती शेजारी राहणाऱ्या तरूणाच्या प्रेमात पडली. काही दिवसांआधी ती माहेरी आली होती आणि मुलाला सोडून प्रियकरासोबत पळून गेली होती. घरातील लोकांनी तक्रार दाखल केली होती. दोघांच्या कुटुंबियांना बोलवण्यात आलं. महिलेला प्रियकरासोबत रहायचं होतं. दोन्ही कुटुंबियांना कोणतीही कारवाई करायची नव्हती.