क्राईमताज्या बातम्यापुणेमहत्वाचेमहाराष्ट्र

पुणे सेक्सटॉर्शनमधून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक; 4 लाख 66 हजार रुपयांना घातला गंडा


पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सेक्ससेक्सटॉर्शनच्या घटना वाढत आहे. सायबर पोलिसांकडे तब्बल याबाबत 1400 अर्ज जमा झाले आहे. मागच्या काही महिन्यांपूर्वी शहरात दोन तरुणांनी यामुळे आत्महत्या केली. दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सेक्सटॉर्शन प्रकरणी मॉडेल कॉलनीमधील एका 64 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार 21 ते 25 मार्च या दरम्यान घडला आहे.व्हॉटसअ‍ॅपवर एक कॉल आला : व्हॉटसअ‍ॅपद्वारे चॅटिंग करुन लैगिक भावना उत्तेजित करुन नग्न होण्यास भाग पाडले. तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन एका ज्येष्ठ नागरिकाला सेक्सटॉर्शनमधून ४ लाख ६६ हजार रुपयांना लुबाडल्याचे समोर आले आहे. फिर्यादी हे 64 वर्षाचे आहे. ते एका कंपनीतून निवृत्त झाले आहेत. ते सध्या घरीच असतात. त्यांना 21 मार्च रोजी व्हॉटसअ‍ॅपवर एक कॉल आला. एका तरुणीने त्यांच्यासोबत व्हॉटसअ‍ॅप चॅटिंग केले.

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी : विश्वास जिंकल्यावर व्हिडिओ कॉल करुन त्यांना लैगिक भावना उत्तेजित करणारा व्हिडिओ दाखविला. त्यांना नग्न होण्यास भाग देखील पाडले. त्यानंतर फिर्यादीचा तो व्हिडिओ कॉल स्क्रीन रेकॉर्ड केला. त्यानंतर त्यांना तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पैसे मागण्यास सुरवात केली. त्यामुळे त्यांनी घाबरुन समोरून सांगेल, तसे पैसे देण्यास सुरुवात केली. विविध प्रकारे त्यांच्याकडून पैशाची मागणी सुरू झाली.

पैश्याची मागणी : समोरील लोक एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यानंतर तक्रारादराला सायबर सेल दिल्ली क्राईम ब्रँचमधून राम पांड्ये बोलत असल्याचे सांगून तुमचा व्हिडिओ युट्युबवर अपलोड होणार आहे. पायल शर्मा हिने तक्रार दिल्याचे सांगितले. त्यानंतर युट्युब प्रतिनिधींशी बोला, असे सांगून संजय सिंग नावाच्या व्यक्तीचा नंबर दिला. त्या व्यक्तीने तो व्हिडिओ डिलिट करण्यासाठी तब्बल दीड लाखांची मागणी केली. तक्रारदाराने पैसे दिल्यावर समोरून पुन्हा कॉल आला. आता तुमचे हे प्रकरण मुंबई सायबर सेलला पाठविणार आहे, अशी भिती दाखवून त्यांच्याकडे ५ लाखांची मागणी केली. अश्या प्रकारे विविध पैश्याची मागणी करत असताना फिर्यादी यांना कळाले की, हे लोक फसवणूक करत आहे. मग त्यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button