ब्रिटिश पाकिस्तानी यूकेच्या गोऱ्या तरुणींना ड्रग्स देऊन अत्याचार करतात..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


काय म्हणाले माजी रॉ प्रमुख?

ब्रिटनमध्ये मूळ पाकिस्तानी असलेले नागरिक कसंही वागत आहेत. ते गोऱ्या तरुणींना आपली शिकार बनवतात. विक्रम सूद यांनी याला वृत्ताला पुष्टी दिली आहे. त्यांनी एकानंतर एक केलेल्या ट्विटमध्ये पाकिस्तानच्या हरकतींचा खुलासा केला आहे. ‘यूकेमध्ये असे प्रकार १९९७ पासून सुरु झाले आहेत. यामध्ये १४०० मुलींवर बलात्कारक झाल्याचं समोर आलेलं आहे. यामध्ये जास्तीत जास्त पाकिस्तानी मूळ असलेल्या नागरिकांचा समावेश आहे’ अशी माहिती सूद यांनी दिलीय.

 

यूकेचे गृहमंत्री सुएला ब्रेवरमॅन यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये, ब्रिटिश पाकिस्तानी यूकेच्या गोऱ्या मुलींवर बलात्कार करतात, त्यांना ड्रग्स देतात.

त्यांचा समाज या गोष्टींना केवळ स्वीकारतच नाही तर अशा अपराधांवर कुठलीही प्रतिक्रिया दिली जात नाही, असं म्हटलं आहे.

यूकेचे गृहमंत्री यांनी ब्रिटिश पाकिस्तानी पुरुषांबद्दल खळबळजनक विधान केलं आहे. ते एक गँग बनून काम करत आहेत. त्यांच्यासाठी गोऱ्या मुलींची शिकार करणं अगदी सोप्पं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ब्रिटिश पाकिस्तानी, गोऱ्या तरुणींच्या परिस्थितीचा फायदा उठवतात, त्यांना ड्रग्स देतात आणि त्यांच्यावर रेप करतात. यासोबत ते म्हणाले की, आम्ही बघितलंय की राज्याचे पोलिस आणि सामाजिक कार्यकर्ते अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत.

यूकेच्या गृहमंत्र्यांनी जो आरोप केला आहे त्यावर भारतीय गुप्तचर एजन्सी रिसर्च आणि अॅनालिसीस विंग म्हणजेच रॉ चे माजी प्रमुख विक्रम सूद यांनी शिक्कामोर्तब केलं आहे.