शरीर संबंधासाठी अल्पवयीन मुलीची विक्री

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


माणगाव: (आशोक कुंभार )अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिने इतरांशी शारीरिक संबंध करावेत यासाठी तिची विक्री केली. हा धक्कादायक प्रकार सन 2021 ते मार्च 2023 या कालावधीत मुळशी तालुक्यातील न्यू लुक मेन्स सलून आणि माणगाव येथे घडला.
दिलशाद इलियास शाह (वय 38), अब्दुल जलील शाह (वय 31), विकी विलास सूर्यवंशी (वय 30), किरण बाळू शेळके (वय 30), गोलू उर्फ आदेश कांबळे (वय 25) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना विकी सूर्यवंशी याने फिर्यादीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. त्यात फिर्यादी मुलगी गरोदर राहिली. त्यांनतर विकी याने किरण शेळके आणि गोलू कांबळे यांना फिर्यादी मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास लावले. त्यासाठी विकी याने दोघांकडून पैसे घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी (Hinjawadi) पोलीस तपास करीत आहेत.