धावत्या रेल्वेसमोर उडी घेत प्रेमाचा शेवट

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


छत्रपती संभाजीनगर : (आशोक कुंभार )दोघेही नात्यातीलच…इन्स्टाग्रामवरून मैत्री वाढली… मैत्रीतून प्रेम बहरले. एकीकडे तो एमपीएससीची तयारी करत असल्याने करिअर ‘सेट’ करून लग्न करूया म्हणत असे, मात्र दुसरीकडे तिचे १९ व्या वर्षी कुटुंबीयांनी महिनाभरापूर्वीच हात पिवळे केले.लग्नानंतर ती मूळ जळगाव जिल्ह्यातून ठाणे येथे सासरी गेली.

त्यानंतरही दोघांचा फोनवर संपर्क होत होता. हा बीएसस्सीचे शिक्षण घेता घेता ठाण्याला गेला. ती सासरच्यांना चुकवून पळून त्याच्यासोबत ठाण्याहून पुण्याला आली, तिथून ते छत्रपती संभाजीनगरला आले अन् दोघांनीही २८ मार्चच्या रात्री साडेनऊच्या सुमारास एकनाथनगर भागात धावत्या रेल्वेसमोर उडी घेत प्रेमाचा शेवट केला.

यात प्रियकर ठार झाला तर प्रेयसी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उमेश मोहन तारू (२३, रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) असे मृत प्रियकराचे नाव आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेशचे तालुक्यातील नात्यातल्याच १९ वर्षीय मुलीसोबत प्रेम जुळले होते. दोघांनी ‘जगेन तर प्रेमासाठी, मरेन तर प्रेमासाठी’ अशा शपथाही घेतल्या. मात्र, तो एमपीएससीची तयारी करत असल्याने तिला ‘एकदा करिअर सेट झाले की, आपण लग्न करू असे सांगत असे. तिनेही उमेशकडे लग्नाचा तगादा लावला नव्हता. परंतु, तिच्या कुटुंबीयांनी २८ फेब्रुवारी रोजी मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यात तिचा विवाह लावून दिला अन् दोघांची ताटातूट झाली.

सासरच्यांनी सून बेपत्ता झाल्याची दिली तक्रार

लग्नानंतर प्रेयसी जवळपास आठ ते दहा दिवस माहेरीच राहिली. प्रेयसीच्या लग्नानंतर ती मध्यप्रदेशातून पतीच्या नोकरीच्या ठिकाणी ठाणे येथे नांदावयास गेली. तरीही प्रेमीयुगुल संपर्कात होते. दरम्यान, २६ मार्चरोजी प्रियकर उमेश आणि तिच्यात भेटण्याचे ठरले. त्यासाठी तो ठाण्याला गेला.

त्यानंतर सासरच्यांना चुकवून ती प्रियकर उमेशसोबत ठाण्याहून पुण्याला गेली. पुण्याहून छत्रपती संभाजीनगरला आले. तोवर सून बेपत्ता झाल्याने तिचा सासरच्या मंडळींनी सर्वत्र शोध घेतला, शोधूनही न सापडल्याने अखेर तिच्या सासरच्यांनी सून बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली.

दोघे ठाणे, पुणे करत करत आले होते छत्रपती संभाजीनगरला

बरोब्बर तिच्या लग्नाच्या महिन्याच्या दिवशीच आत्महत्या

करिअर ‘सेट’ करू म्हणत लग्न राहिले अधुरे अन् गेला जीव