पत्नी प्रियकरासोबत पळाली, जावयाने सासऱ्यालाच संपवले..
जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली असून, जावयाने सासऱ्याची गोळ्या झाडून केली हत्या केली आहे.
पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने याचा राग पतीला आला होता. त्यामुळे त्याने पत्नीच्या वडिलाचा खून केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अंबडच्या शारदानगर येथे बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे अंबड परिसरात खळबळ उडाली आहे. पंडित भानुदास काळे असे मयताचे नाव असून, किशोर शिवदास पवार असे संशियत आरोपीचे नाव आहे. दरम्यान हत्या केल्यावर आरोपीने घटनास्थळवरून पळ काढला आहेयाबाबत पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पंडित भानुदास काळे यांची मुलगी नंदा काळे हिचा विवाह छत्रपती संभाजीनगरच्या आडूळ येथील किशोर शिवदास पवार याच्यासोबत झाला होता. सर्व काही सुरळीत सुरु होते. दरम्यान त्यांना दोन मुली व दोन मुले झाली. मात्र गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये वाद होऊ लागल्याने दोघांचे पटत नव्हते. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोडच्या एका व्यक्तीसोबत नंदा काही दिवसांपूर्वी पळून गेली. त्यामुळे याचा राग आल्याने किशोर नेहमी सासरी जाऊन सासरा पंडित काळे यांच्यासोबत वाद घालून, त्यांना शिवागाळ करीत होता. तसेच माझ्या पत्नीला सासरी नांदायला पाठावा, अन्यथा तुम्हाला बघून घेईल अशा धमक्या देखील देत होता.
थेट गोळ्या घालून केली हत्या…
दरम्यान, आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास किशोर पवार आणखी दोघांना सोबत घेऊन शारदानगरला आला. यावेळी पंडित काळे व त्यांचा मुलगा पारलेश काळे दोघेही घरीच होते. यावेळी किशोरने पुन्हा शिवीगाळ सुरु करत पंडित काळे यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने काळे यांना मारहाण करायला सुरवात केली. तसेच कुणाला काही कळण्याच्या आता त्याने कंबरेची बंदूक काढून त्याने पंडित काळे यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात पंडित काळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर काळे यांचा जीव गेल्याचे लक्षात येताच त्याने आपल्या साथीदारांस तेथून पळ काढला.
पोलिसांची घटनास्थळी धाव…
दरम्यान घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे हे देखील आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी मंदाकिणी भोसले यांच्या फिर्यादीवरून तीन संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांचे पथक आरोपींच्या शोधात आहे.