काकाच्या प्रेमात वेडी पुतणी; पैसे, दागिने घेऊन फरार..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


उत्तर प्रदेशातील बांदा येथे काकाच्या प्रेमात पुतणीने पैसे आणि दागिने घेऊन घरातून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शोध घेतल्यानंतर नातेवाईकांनी प्रियकर काकावर गोळ्या झाडल्या.

त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोहोचलेल्या काही लोकांनी जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कारवाई सुरू केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

तरुणीही यानंतर तिच्या प्रियकराजवळ हॉस्पिटलमध्ये पोहोचली. एसपी अभिनंदन यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकर त्याच्या पुतणीवर प्रेम करत होता, दोघं अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पोलीस या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत. हे प्रकरण नरैनी कोतवाली भागातील एका गावाशी संबंधित आहे. येथे राहणारा तरुण आणि त्याच परिसरात राहणारी त्याची पुतणी यांच्यात चार वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते.

रविवारी रात्री प्रेयसीने घरातून पैसे आणि दागिने घेऊन प्रियकराच्या घरी गेली. मुलगी बेपत्ता झाल्याने नातेवाईकांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी शोध सुरू केला. रात्री उशिरा ही तरुणी प्रियकराच्या घरी सापडली. यानंतर नातेवाईक तरुणीला घेऊन घरी जात होते. दरम्यान, अचानक कशावरून तरी वाद झाला. मुलीचे काही नातेवाईक मुलीला घेऊन घरी गेले. मात्र, तरुणीचा भाऊ प्रियकरासह शेतात गेला.

प्रियकराला बेदम मारहाण केली. संधी मिळताच प्रियकराने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तरुणीच्या भावाने त्याच्यावर गोळीबार केला. गोळी लागल्याने तरुण जखमी झाला. याप्रकरणी एएसपी लक्ष्मी निवास मिश्रा म्हणाले, रविवारी रात्री नारायणी पोलीस स्टेशनमध्ये एका व्यक्तीवर गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले. चौकशीत समोर आले की, मुलगी तरूणाची पुतणी आहे. वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.