ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

युपीआय पेमेंटवर झटका, दोन हजारांपेक्षा अधिकच्या व्यवहारांवर माजावे लागणार शुल्क


देशात डिजिटल क्रांती आली आणी त्यामुळे जग अगदी जवळ आले. व्यवहारात तर या डिजिटल क्रांतीचा मोठा वाटा राहिला. बँकिंगची रटाळ आणि वेळखाऊ प्रक्रियेला जणू बुस्टर डोस मिळाला.



आता ग्राहकांना व्यवहार करण्यासाठी वारंवार बँकेत जाण्याची गरज उरली नाही. त्याच्या एटीएमच्या चकराही कमी झाल्या आहेत. ऑनलाइन पेमेंट मोडच्या (Online Payment Mode) वापरामुळे हे शक्य झाले आहे. डिजिटल पेमेंटचे देशात प्रचंड पीक आले आहे. गल्लीबोळातील भाजी विक्रेत्यापासून ते मोठ-मोठ्या दुकान, हॉटेलमध्ये या डिजिटल पेमेंटमुळे झटपट व्यवहार सुरु झाले. पण UPI पेमेंटसाठी आता तुमचा खिसा खाली होईल. गुगल पे (Google Pay), फोन पे (Phone Pay) आणि पेटीएम (Paytm) सारख्या डिजिटल माध्यमांद्वारे 2,000 रुपयांपेक्षा अधिकचा व्यवहार केल्यास 1 एप्रिलपासून शुल्क लागणार आहे.

शुल्काची अधिसूचना

भारतीय राष्ट्रीय देयके मंडळाने (NPCI) एक अधिसूचना काढली आहे. त्यानुसार, युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजे UPI च्या माध्यमातून मर्चंट ट्रान्झॅक्शनवर प्रीपेड पेमेंट इंस्ट्रमेंट्स (PPI) शुल्क आकारण्याची सूचना केल आहे. अधिसूचनेनुसार, 2,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कमेच्या UPI व्यवहारांवर 1.1 टक्के शुल्क द्यावे लागेल. हे शुल्क मर्चंट ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यापाऱ्यांना पेमेंट करणाऱ्या युझर्सकडून वसूल करण्यात येणार आहे.

बिझनेस स्टँडर्डने याविषयीचा अहवाल दिला आहे. त्यानुसार, प्रीपेड पेमेंट इंस्ट्रमेंट्स (PPI) शुल्क व्यवहारांवर लागू आहे. UPI व्यवहारांवर 1.1 टक्के शुल्क द्यावे लागेल. हे शुल्क मर्चंट ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यापाऱ्यांना पेमेंट करणाऱ्या युझर्सकडून घेण्यात येईल. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशनने (NPCI) अधिसूचनेत, या नवीन बदलाचा आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. 30 सप्टेंबर 2023 रोजी पूर्वी हा आढावा घेण्यात येईल, असे एनपीसीआयने स्पष्ट केले आहे.

काय आहे युपीआय

UPI म्हणजे युनिफाईट पेमेंट्स इंटरफेस एक जलद पेमेंट सेवा आहे. ही सेवा मोबाईल क्रमाकांच्या माध्यमातून काही सेकंदातच एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पेमेंट ट्रान्सफर करते. भारतीय राष्ट्रीय देयके मंडळाने (NPCI) ही पेमेंट पद्धत विकसीत केली आहे. व्हर्चुअल पेमेंट ॲड्रेस (VPA) या माध्यमातून बँक खात्याचा तपशील देण्याची गरज नसते. त्यामुळे ही पद्धत सुरक्षित मानण्यात येते.

आता परदेशातही सेवा

युपीआय व्यक्ती ते व्यक्ती (P2P) आणि व्यक्ती ते व्यापारी (P2M) यांच्यादरम्यान व्यवहारांना परवानगी देते. UPI प्रमाणेच सिंगापूरच्या Pay Now सेवा देते. वापरकर्त्याच्या मोबाईल क्रमांकावरुन एका बँक अथवा ई-वॉलेट खात्यातून दुसऱ्या खात्यात रक्कम पाठवते अथवा प्राप्त करते. देशातील बँका आणि खासगी वित्तीय संस्थांच्या माध्यमातून पेनाऊ व्यवहार पूर्ण करते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button