“एकच मिशन जुनी पेन्शन” पूर्वलक्षी प्रभावाने (OPS) पेन्शन योजना लागू करण्याचे लेखी आश्वासन

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
पुरंदरच्या धुरंदारांचे हार्दिक अभिनंदन….
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
14 मार्च पासून सुरू असलेल्या समन्वय समितीच्या उपोषणास पुरंदर तालुक्यातील सर्व संघटनांच्या अध्यक्ष,सचिव आणि समन्वय समितीमध्ये असणाऱ्या सदस्यांनी आपल्या जीवाचे रान करून तसेच कोणत्याही कारवाईची फिकीर न करता संप यशस्वी केला..

संप यशस्वी झाला आणि आपल्या जिव्हाळ्याचा विषय आणि आपल्या संपाचे मूळ “एकच मिशन जुनी पेन्शन” पूर्वलक्षी प्रभावाने (OPS) पेन्शन योजना लागू करण्याचे लेखी आश्वासन मा.मुख्यमंत्री यांनी दिले आहे यामुळे आपण आपली लढाई जिंकलो…

म्हणूनच आज पालखी तळ सासवड याठिकाणी सर्व संघटनांचे प्रतिनिधी,मुख्याध्यापक,शिक्षक तसेच काही मान्यवर यांच्या उपस्थिती मध्ये विजयोत्सव साजरा करण्यात आला.

या विजयोत्सवामध्ये पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर,सेकंडरी स्कुल को-ऑप क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे,पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले,शिवशक्ती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आत्माराम शिंदे,पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य व्यवस्थापक प्राचार्य राहुल येळे,पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रल्हाद कारकर,मुख्याध्यापक तुकाराम मुळीक,गायकवाड पी.जी.हनुमंत कामठे,पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघडीचे जिल्हा प्रतिनिधी बाबूराव गायकवाड़,पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव दत्तात्रय रोकड़े,हवेली तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दिलीप थोपटे,जनसेवा सहकारी बँकेचे व्यवस्थापक बाळासाहेब पवार,पुरंदर तालुका शिक्षकेतर संघाचे माजी अध्यक्ष पांडुरंग जाधव,उपशिक्षाक सुनील वाघ,नारायण भदाने,प्रवीण तांदळे,शिक्षकेतर कर्मचारी धूळदेव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.