विवाहितेवर अत्याचार; आरोपी निर्दोष

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

नगर : कर्जत पोलिस स्टेशन येथे दि. 4/1/2015 रोजी भा.दं.वि. कलम 376, 504 व अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा कलम 3(1), (12), 3(2), (5) अन्वये अनुसूचित जमातीच्या महिलेवर आरोपी शंकर लक्ष्मण जाधव याने तिचेवर बलात्कार करुन झालेला प्रकार तू कोणाला सांगू नको, नाही तर तुम्हाला या गावात राहू देणार नाही, अशी दमदाटी केल्याने महिलेच्या तक्रारीतून गुन्हा दाखल केला होता.
त्यांची चौकशी नुकतीच श्रीगोंदा जिल्हा न्यायालयात होवून आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपीतर्फे अ‍ॅड. सतिशचंद्र वि. सुद्रिक यांनी काम पाहिले.