खाऊ देण्यासाठी लेकीला घेऊन गेला अन् दारुच्या नशेत केलं भयानक कृत्य

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


सांगली: दारूच्या नशेत चार वर्षांच्या चिमुकलीला बापानेच विहिरीत टाकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सांगली जिल्ह्यातील कुरळपमध्ये ही घ या प्रकरणी आरोपी अण्णाप्पा तुकाराम कोळी याला पोलिसांनी अटक केलीय. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अण्णाप्पा कोळी आणि त्याचे कुटुंब कडकलक्ष्मीचा व्यवसाय करते. कुरळपमधील माळरानावर सध्या ते वास्तव्यास आहेत. तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील खुपशिंगी इथला आहे.

गेल्या काही वर्षांपासून अण्णाप्पा हा पत्नी आणि दोन मुलींसह कुरळपमध्ये राहत आहे. लहान मुलीसह पत्नी घरातून निघून गेली होती कामावरून घरी आल्यानंतर अण्णाप्पाने श्रीदेवीला खाऊ आणायला मंगळवारी घरातून बाहेर नेलं. त्यानंतर रात्री तो घरी परतला तेव्हा त्याच्यासोबत मुलगी नव्हती. नातेवाईकांनी याबाबत चौकशी केली त्यावेळी अण्णाप्पाने मुलीला कुरळप-येलूर रस्त्यावरच्या विहिरीत फेकल्याचं सांगितलं.

कुरळप पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम यांनी घटनास्थळी पाहणी केली आणि मृतेदह शोधण्यासाठी बुधवारी पहाटेपर्यंत शोधमोहिम राबवण्यात आली. रात्रभर पाण्याचा उपसा करण्यात आला. त्यानंतर बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास पोलिसांना मृतदेह आढळला. या प्रकरणी भीमराव तुकाराम कोळी यांनी पोलिसात फिर्याद दिली असून अधिक तपास केला जात आहे.