क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गरोदर राहिलेल्या मुलीचा गर्भपातानंतर मृत्यू


धुळे: (अशोक कुंभार )लग्नाचं आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना धुळे जिल्ह्यात समोर आली आहे.धक्कादायक बाब म्हणजे संबंधित मुलगी गरोदर (Pregnant) राहिली. मात्र गर्भपात केल्यानंतर अति रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी अत्याचार करणारा आरोपी राज सिकलकर याला अटक केली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर मुलीचा गर्भपात करणारी नर्स प्रमिला पवार पसार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.

धुळ्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावाजवळ असलेल्या घोड्यामाळ इथे ही घटना घडली. आरोपी राज सिकलकरने एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिचा एका खाजगी रुग्णालयातील नर्सने पैसे घेऊन गर्भपात केला. परंतु गर्भपातानंतर अति रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अति रक्तस्त्राव झाल्यामुळे मुलीचा मृत्यू

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित नर्स प्रमिला पवार आणि त्या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या राज सिकलकर यांच्यावर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील अल्पवयीन मुलगी ही सोळा वर्षाची असून यातील आरोपी राज दीपक सिकलकरने या अल्पवयीन मुलीला वेळोवेळी लग्नाचं आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप मुलीच्या आईने केला. मुलगी गरोदर असल्याचं समजल्यानंतर तिच्या आईने तिला धुळे शहरातील साक्री रोडवरील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेलं. इथे कार्यरत असलेल्या प्रमिला पवार नावाच्या नर्सने पीडितेच्या कुटुंबीयांकडून दहा हजार रुपयांची मागणी केली. कुटुंबियांनी तिला पैसे दिल्यानंतर मुलीचा गर्भपात करण्यात आला आणि या मुलीला त्यानंतर पुन्हा गावी नेण्यात आले. मात्र जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे या मुलीचा मृत्यू झाला.

अल्पवयीन मुलीचा घरातच गर्भपात

पिंपळनेर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी प्रमिला पवार हिला ताब्यात घेण्यासाठी खाजगी रुग्णालय गाठले असता तोपर्यंत ती पसार झाली होती. धक्कादायक बाब म्हणजे प्रमिला पवार हिने या अल्पवयीन मुलीचा गर्भपात घरी नेऊन केला असल्याचे समोर आलं आहे. दरम्यान पोलिसांनी संशयित आरोपी राज सिकलकरला अटक केली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button