क्राईमताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्र

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचे अपहरण


पुणे : (आशोक कुंभार )स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाला धमकावून त्याचे मोटारीतून अपहरण करण्यात आल्याची घटना राजेंद्रनगर परिसरात घडली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अपहरण झालेला तरुण तसेच आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. शिवलिंग दिगंबर गायकवाड (वय ३०, रा. चिंबळी, ता. खेड, जि. पुणे) याने या संदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिवलिंग याचा मावसभाऊ बसवंत माधव गायकवाड (वय २५) स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी तो रात्री अकराच्या सुमारास शास्त्री रस्त्यावरील अभ्यासिकेतून घरी निघाला होता. त्या वेळी सेनादत्त पोलीस चौकी परिसरात असलेल्या भिडे हाॅस्पिटलजवळ मोटारीतून आलेल्या चार ते पाच जणांनी बसवंतला अडवले. त्याला धमकावून मोटारीत बसवले. त्याचे अपहरण करून आरोपी पसार झाल्याचे शिवलिंग गायकवाड याने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पाेलीस निरीक्षक निकुंभ तपास करत आहेत.




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button