क्राईमताज्या बातम्यादेश-विदेश

वहिनी-वहिनी म्हणत चार मुलांच्या आईला पळवून घेऊन गेला तरूण


बिहार: (आशोक कुंभार ) बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातून चार मुलांची आई असलेली महिला आपल्या प्रियकरासोबत फरार झाली. त्यानंतर पतीने तिला परत मिळवण्यासाठी कोर्टाकडे मदत मागितलीज्यानंतर पोलिसांनी महिलेला शोधलं.घटनेबाबत महिलेचा पती रंजीत कुमार महतो याने कोर्टात दिलेल्या अर्जात सांगितलं की, ‘माझं लग्न 2010 मध्ये जवळच्या गावातील तरूणीसोबत झालं होतं. ज्यानंतर आम्हाला चार मुले झालीत ज्यात दोन मुलं आणि दोन मुली आहेत.

पतीने पुढे लिहिलं की, घरातील सगळेच लोक पंजाबमध्ये मजुरीचं काम करतात. याचाच फायदा घेत शेजारी राहणाऱ्या नीतीश कुमार महतोने त्याच्या 20 वर्षीय पत्नीला वहिनी-वहिनी म्हणून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं.

पीडित पती म्हणाला की, नीतीश चोरून माझ्या पत्नीला तिच्या रूममध्ये जाऊन भेटत होता. ज्याचा माझ्या आईने विरोध केला होता. तेव्हा पत्नी माझ्या आईसोबत भांडत होती. पीडितने पुढे सांगितलं की, 6 जानेवारी 2023 ला माझी पत्नी चार मुलांना सोडून घर बांधण्यासाठी ठेवलेले 1 लाख 50 हजार रूपये आणि काही दागिने घेऊन फरार झाली.

पीडित व्यक्तीने सांगितलं की, बराच शोध घेऊनही पत्नीचा पत्ता लागला नाही तेव्हा त्याने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर तो कोर्टात मदत मागण्यासाठी गेला.

पतीनुसार, या घटनेच्या साधारण दोन महिन्यांनंतर त्याने सांगितल्यावर एका गावातील घरातून त्याच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. याबाबत पतीने सात लोकांवर त्याच्या पत्नीचं अपहरण केल्याबाबत आरोप केले आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button