क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुऱ्हाडीचे घाव घालत दीराने केली भावजयीची निघृण हत्या


नाशिक : (आशोक कुंभार )तालुक्यातील बिवळ येथे सख्या चुलत दीराने कुऱ्हाडीचे घाव घालून भावजयीची निघृण हत्या केलीयाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी चंदर गावंडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, दुपारी अकरा वाजेच्या दरम्यान मयत यशोदा लक्ष्मण गावंडे (वय २६) ही विवाहिता राहत्या घरी स्वयंपाक करत असतांना तेथे संशयित आरोपी सख्खा चुलत दीर रमेश परशराम गावंडे हा हातात कुऱ्हाड घेऊन आला. त्याने यशोदा यांच्या डोक्यावर, मानेवर, मागील बाजूस कुऱ्हाडीचे सपासप चार वार केले.कुऱ्हाडीचे घाव इतके खोलवर होते की, मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या पुर्णपणे तुटल्याने मोठ्याप्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता आरोपीच्या चपला, गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड ताब्यात घेत पंचनामा केला आहे. विवाहितेस एक दोन महिन्याचे अपत्य आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. संशयित आरोपी फरार झाला असून पोलिस निरीक्षक संदीप कोळी कसून तपास करीत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button