कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील एकाच कुटुंबातील ३ जण ठार

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

कोल्हापुर : (अशोक कुंभार ) कराड ते कोथरूड जाणाऱ्या रोडवर येणपे तालुका कराड गावच्या हद्दीत रिक्षा व ट्रॅक्टर यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तीनजण जागीच ठार झाल  तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात आज (शनिवार) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास झाला.

महारूगडे कुटुंबीय हे मुळचे शाहुवाडी तालुक्‍यातील आहेत. सध्या ते पुण्यात असतात. दरम्‍यान पणुंद्रे तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर येथे गावच्या यात्रेसाठी ते पुण्याहून रिक्षाने पणुंद्रेकडे जात होते. यावेळी काळाने या कुटुंबावर घाला घातला. यावेळी रिक्षा आणि ट्रॅक्‍टर यांच्यात भीषण अपघात झाला. यामध्ये सुवर्ण सुरेश महारुगडे, सुरेश सखाराम महारुगडे, समीक्षा सुरेश महारुगडे (सर्व राहणार पनुंद्रे तालुका शाहुवाडी जिल्हा कोल्हापूर) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

तर मुलगा समर्थ सुरेश महारुगडे हा गंभीर जखमी झाला असून, ग्रामस्थांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.