शिक्षकांचे अच्छे दिन, शिंदे-फडणवीस सरकारने पगारात केली डब्बल वाढ

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

मुंबई : (अशोक कुंभार )भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प आज(दि.09) सादर होत आहे. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.
शिंदे सरकारने शेतकरी, महिला, यांच्यासह शिक्षणकांनाही विशेष पॅकेज जाहीर केले आहे.

शिंदे सरकारकडून शिक्षणसेवकांना भरघोस मानधन देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. सरकारकडून सरासरी 10 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : 6000 वरुन 16,000 रुपये

माध्यमिक शिक्षण सेवक : 8000 वरुन 18,000 रुपये

उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : 9000 वरुन 20,000 रुपये

पीएमश्री शाळा : 816 शाळा/ 5 वर्षांत 1534 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.
याचबरोबर सरकारने महिलांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या असून त्यात महत्त्वाची म्हणजे सर्व महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सुट मिळणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत मिळेल अशी घोषणा फडणवीस यांनी केली. याआधी राज्यात 75 वर्षांवरील नागरिकांना एसटी बसचा प्रवास मोफत करण्यात आला आहे. यानंतर महिलांना 50 टक्के सवलतीचा हा निर्णय मोठा मानला जात आहे.

फडणवीस म्हणाले की, चौथे सर्वसमावेशक महिला धोरण घोषित करणार आहोत. मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेकलाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल. पिवळ्या व केशरी रेशन कार्ड कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, इयत्ता चौथी 4 हजार रुपये, सहावीत गेल्यावर सहा हजार रुपये आणि अकरावीत आठ हजार रुपये अनुदान दिले जाईल. लाभार्थी मुलीचे वय 18 जागा पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये दिले जातील असेही जाहीर करण्यात आले.

महिलांच्या आरोग्यासाठी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत चार कोटी महिला व मुलींची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येतील. राज्यातील अंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची रिक्त असलेली सुमारे वीस हजार पदे भरण्यात येतील. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचाराची मर्यादा वार्षिक दीड लाखावरून पाच लाख रुपये करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना केली.