दीपक केसरकर यांना शिवसेनेचा पुरेसा इतिहास माहिती नसावा:छगन भुजबळ

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

नाशिक : (आशोक कुंभार ) राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर टीका केली आहे. दीपक केसरकर आणि संजय शिरसाट यांच्यावर भुजबळांनी टीका केली आहे.

केसरकर हे यापूर्वी दोन वर्ष काँग्रेस, राष्ट्रवादी सोबतच सरकार चालवले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यावेळी त्यांनी एकही उमेदवार दिला नव्हता. याआधी केसरकर राष्ट्रवादीत होते.

मग ते शिवसेनेत गेले. त्यामुळे त्यांना शिवसेनेचा इतिहास माहिती नसावा, असं भुजबळ म्हणालेत. संजय शिरसाठ काय बोलतील. काही सांगता येत नाही. ही मोठी मंडळी आहेत. त्यांच्यावर काय बोलावं?, असं भुजबळ म्हणालेत.