महाराष्ट्रात ईडीची कारवाई; मुंबई, नागपुरमध्ये १५ ठिकाणी छापेमारी

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


नागपुर: (आशोक कुंभार ) ईडीने महाराष्ट्रात मोठी कारवाई केली आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. नागपुर आणि मुंबईसह ईडीने तब्बल १५ ठिकाणी छापे टाकले आहेतया छापेमारीत ५.५१ कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने आणि १.२१ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या बद्दलचे ट्विट करत ईडीने कारवाईची माहिती दिली आहे, तसेच अधिक तपास सुरू असल्याचेही सांगितले आहे

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) छाप्यांमुळे नागपुरात खळबळ उडाली आहे. नागपूरचे अनेक स्टील, लोह आणि रिअल इस्टेट व्यावसायिक ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकल्यानंतर त्यांची चौकशी आणि चौकशी सुरू आहे. यामध्ये ५.५१ कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने आणि १.२१ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या कारवाईनंतर अधिक तपास सुरू असल्याची माहिती ईडीने दिली आहे.

या १५ ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या सर्वांचा तपास सुरू आहे. याशिवाय अनेकांची फसवणूक करणाऱ्या पंकज मेहाडियाच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे.

ईडीने कारवाई केलेला पंकज मेहाडिवर व्यावसायिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. तो नागपूरच्या रामदासपेठ परिसरात राहतो. त्याच्यासह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. २०२१ मध्ये यांना तुरुंगातही पाठवण्यात आले होते. यानंतर काल ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकला आहे.

काय आहेत ईडीचे अधिकार..

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा अंतर्गत ‘ईडी’चौकशी करते. सध्या या कारवाईच्या प्रकरणांत लक्षणीय वाढ झाली आहे.ईडी परकीय चलन व्यवस्थापन कायदा, १९९९ (FEMA) मदतीनेही ही कारवाई करते. परकीय चलन व्यवस्थापन कायद्यानुसार विदेशी व्यापार तसेच विदेशी आर्थिक व्यवहाराची चौकशी केली जाते.