ताज्या बातम्यामहाराष्ट्र

या पीकाला चांगला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय


धुळे : (आशोक कुंभार ) जिल्ह्यात गव्हाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी (FARMER) अद्यापही शेतातून गहू काढलेला नाही. सद्यस्थितीत 2100 ते 2300 रुपये क्विंटल रूपये भाव गव्हाला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्यातला शेतातला गहू भाव वाढल्यानंतर काढणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आणखी किती दिवस शेतकऱ्यांना  गव्हाचे पीक काढण्यासाठी वाट पाहावी लागणार अशी चर्चा सुरु झाली. यंदाच्यावर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे गव्हाचे पीक सगळीकडे चांगले आले आहे.धुळ्यात यावर्षी चांगल्या प्रतीच्या गव्हाला अवघा 2100 रुपये क्विंटल ते 2200 रुपये क्विंटल दराने कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी केली जात आहे. मात्र गव्हाच्या पेरणीला काढणीला आणि मजुरीचा खर्च जाता तो परवडत नसल्याने गव्हाचे भाव वाढण्याची प्रतीक्षा मुकटी भागातील शेतकरी करीत आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील गहू अद्यापही काढलेला नाही, सरकारने गहू आणि कांदा भावासाठी हस्तक्षेप करून भाव वाढवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावर्षी मुबलक पाणी असून वातावरण देखील चांगलं झाला आहे. त्यामुळे उत्पादन देखील वाढणार आहे, मात्र असे असताना गावाला भाव नसल्याने शेतातला गहू आम्ही भाव वाढ झाल्यानंतर काढणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.

कांद्याला 931 रुपये इतका बाजार भाव देण्यात आला

कांद्याचे बाजार भाव कोसळल्यानंतर राज्य सरकारच्यावतीने नाफेड मार्फत कांदा खरेदीची घोषणा केली, मात्र कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव बाजार समिती अद्यापही नाफेड मार्फत कांदा खरेदीला सुरुवात झाली नसल्याच्या बातम्या आल्यानंतर विधिमंडळात नाफेड मार्फत कांदा खरेदीवर विरोधकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले. त्यानंतर लासलगाव येथे बाजार समितीच्या आवाराबाहेर नाफेड ने नेमलेल्या सब एजन्सीज न्युट्रोव्ही ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी नाशिकच्या वतीने या सब एजन्सीने तिच्या हाताखाली लासलगाव येथील कृष्ण धारा फार्मर्स प्रोडूसर कंपनीला सब एजन्सी म्हणून नेमणूक करीत कांदा खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे. लासलगाव बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णा जगताप यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी खडक माळेगाव येथील कांदा उत्पादक शेतकरी राजेंद्र यशवंत शिंदे यांचा 35 क्विंटल कांद्याची खरेदी केले. या कांदयाला 931 रुपये इतका बाजार भाव देण्यात आला आहे. पण ही खरेदी बाजार समित्यामध्ये झाल्यास व्यापारी आणि नाफेड मध्ये बाजार भावात स्पर्धा निर्माण होत 100 ते 200 रुपये प्रति क्विंटल बाजार भावात वाढ होत शेतकऱ्यांचा फायदा होईल असे शेतकरी प्रतिनिधी सांगत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button