ताज्या बातम्यामहत्वाचे

चक्क नवऱ्यांची केली अदलाबदल; बिहारमधील अजब प्रेम कहाणीमुळे संपूर्ण देशाला धक्का


बिहार:मधून एक अजब प्रेमाची गजब कहाणी समोर आली आहे. ही प्रेम कहाणी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. काही लोकांनी याला मॉर्डन प्रेम काहाणी देखील म्हटले आहे. सध्या ही घटना सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.
बिहारमधील खगरिया येथे ही घटना घडली आहे.बिहारमधील दोन महिलांचे चक्क एकमेकांच्या पतींवर प्रेम जडलं, एवढेच नाही तर प्रेमाला न्याय देत दोन्ही जोडप्यांनी एकमेकांसोबत लग्नही केले. धक्कादायक बाब म्हणजे यात एकाला चार तर दुसऱ्याला दोन मुलं आहेत. दोन्ही महिला एकमेकींच्या नवऱ्याच्या प्रेमात पडल्या होत्या. यानंतर दोघांनी नवऱ्याची अदलाबदल करून मंदिरात लग्न केले.

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, हरदिया गावातील रहिवासी असलेल्या नीरजचे लग्न 2009 मध्ये पसरहा गावात रुबी देवीसोबत झाले होते. दरम्यान, त्याला चार मुलं देखील आहेत. जानेवारी 2022 मध्ये रुबी पसरा गावात राहणाऱ्या मुकेश कुमारच्या प्रेमात पडली. मुकेश देखील विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. काही दिवसांनी दोघांनी लग्न केले.

या प्रकारामुळे नाराज झालेल्या रुबीच्या पतीने मुकेशविरुद्ध पसारा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. नीरजने सांगितले की, गावात अनेकदा पंचायतही झाली पण मुकेश राजी झाला नाही. वर्षभर खटला चालला. पण रुबी परत आली नाही.

दरम्यान, संतापलेल्या नीरजने बदला घेण्याचे ठरवले. त्याने मुकेशच्या पत्नी रुबीला फोन केला. मुकेशच्या पहिल्या पत्नीचे नाव देखील रुबी आहे. नीरज आणि रुबी (मुकेशची पहिली पत्नी) यांची आठवडाभर चर्चा सुरू होती. दरम्यान, रुबीही नीरजच्या प्रेमात पडली आहे. यानंतर, रविवारी, 18 फेब्रुवारी रोजी दोघांनी मंदिरात लग्न केले. नीरज टाटा कंपनीत तर मुकेश मजूर म्हणून काम करतो, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button