शेतात झोपलेल्या तरुणाचा दगडाने ठेचून खून

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


येरमाळा : ( आशोक कुंभार ) शेतात झोपण्यासाठी गेलेल्या एका २३ वर्षीय तरुणाचा अज्ञातानी दगडाने ठेचून खून केल्याची घटना येरमाळा येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेवून त्यांची कसून चौकशी सुरु केली आहे.

येरमाळा येथील रामराजे सतीश बारकुल (२३) हा बुधवारी रात्री येरमाळा कळंब रोडलगत असलेल्या आपल्या शेताकडे झोपण्यासाठी गेला होता. गाठ्याजवळ झोपलेला असताना अज्ञातांनी त्याच्या डोक्यात दगड घालूव व नंतर चेहरा दगडानेच ठेचून खून केला. हा प्रकार सकाळी वडील जनावरांचे दूध काढण्यासाठी शेताकडे गेल्यावर त्यांच्या निदर्शनास आला. खून केल्यानंतर आरोपींनी तरुणाचा चेहरा दगडांनीच झाकून ठेवला होता.

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर येरमाळा पोलिसांनी पंचनामा करुन काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. रामराजे हा सतीश बारकूल यांचा एकुलता एक मुलगा होता. शेतजमीन अत्यल्प असल्याने तो ट्रॅक्टर चालवून घरप्रपंचाला मदत करीत होता. गावाकडे आल्यानंतर पशुधनाच्या संरक्षणासाठी तो नेहमीच झोपण्यासाठी आपल्या शेतात जात असत.