लग्नानंतर 16 तासांत नववधू विधवा, नवरदेवाचा झाला मृत्यू

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

उत्तर प्रदेश: च्या मेरठमधील कुटुंबात लग्नाचा आनंद अचानक शोकात बदलल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. लग्नानंतर फक्त 16 तासांनी नवरदेवाचा मृत्यू झाला.
रोड अपघातात नवरदेवाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. काही तासांपूर्वी लग्न झालं होतं. त्यानंतर या घटनेमुळे नववधू विधवा झाली आहे.

मेरठच्या सरुरपूर परिसरातील मैनापट्टी गावात ही वेदनादायक घटना घडली आहे. गुडगावमध्ये खासगी नोकरी करणाऱ्या सनीचे लग्न झालं होतं. सकाळी 6 वाजता, सनीने वधूला घरी आणलं. ज्यानंतर विवाहाशी संबंधित कार्यक्रम दिवसभर चालू राहिले. संध्याकाळी सनी त्याच्या मित्राबरोबर बाईकवरून जात होता. याच दरम्यान रस्त्यात बांधकाम काम चालू होते.

अचानक सनीची बाईक घसरली आणि दोघांनाही गंभीर दुखापत झाली. अपघातात सनीचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या मित्राला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो जखमी झाला आहे. सनीच्या मृत्यूची बातमी ऐकून कुटुंबीयांना तसेच मुलीकडच्या मंडळींना मोठा धक्का बसला आहे. लग्नाचा आनंद अचानक शोकात बदलला. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.