फक्त पत्नीला घाबरवण्यासाठी गळ्याला दोर बांधला, बॅलन्स गेला आणि सगळं संपलं!

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


कानपुर:  मनुष्याचा उतावळेपणा आणि मूर्खपणा त्यांच्या जीवावर बेतू शकतो. अशा अनेक घटना समोर येत असतात ज्यात व्यक्तीच्या छोट्याशा चुकीमुळे त्याचा जीव गेला. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून समोर आली.
कोहना भागात रविवारी रात्री पत्नीसोबत वाद झाल्यानंतर एका पतीने तिला घाबरवण्यासाठी रूम बंद केली आणि आपल्याच गळ्यात गळफास टाकला. पण असं करणं पती-पत्नी दोघांनाही महागात पडलं.

गळ्यात दोरी बांधल्यानंतर पतीचं संतुलन अचानक बिघडलं आणि गळफास लागला. ज्यात व्यक्तीचा मृत्यू झाला. हे बघून पत्नीने आरडाओरड सुरू केली. तेव्हा शेजारचे लोक धावत आले आणि त्यांना व्यक्ती हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. इथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 28 वर्षीय मृत अमित दुबे एका डॉक्टरकडे कंपाऊंडर होता.

गेल्यावर्षी 10 फेब्रुवारीला शुक्लागंज येथील श्वेतासोबत त्याचं लग्न झालं होतं. रविवारी रात्री अमित दुबे नशेच्या स्थिती घरी आला तेव्हा पत्नी श्वेतासोबत त्याच्या कशावरून तरी वाद झाला. त्यानंतर वाद इतका वाढला की, तो आत्महत्या करतो असं म्हणाला आणि धमकी देत रूमचा दरवाजा आतून बंद केला. गळ्यात दोर बांधून तो पत्नीला घाबरवू लागला. अर्धा तास तो कधी गळफास बांधत होता तर कधी गळ्यातून काढत होता.

या दरम्यान बॅलन्स बिघडल्याने गळ्यातील दोरी घट्ट झाली आणि त्याला गळफास लागला. हे बघून पत्नी श्वेताने आरडाओरड केली. शेजारी लोक धावत आले आणि त्यांनी अमितला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण त्याचा मृत्यू झाला होता.