नभांगन फाउंडेशने आधार दिल्यामुळे संतोष भोसले यांच्या घराचे स्वप्न पूर्ण
नभांगन फाउंडेशने आधार दिल्यामुळे संतोष भोसले यांच्या घराचे स्वप्न पूर्ण
बीड : गेवराई अंबू नाईक तांडा खांडवी येथील संतोष मोहन भोसले या पारधी समाजाच्या परिवारास एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय औरंगाबाद येथून शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले. घरकुलाचे बांधकामाचे हप्ते पंचायत समिती गेवराई मार्फत देण्यात आले होते. दिलेल्या हप्त्यांमधून संतोष भोसले यांनी घराचे बांधकाम करणे चालू केले. परंतु शबरी आवास योजनेअंतर्गत मिळालेल्या पैशांमधून घरांच्या फक्त भिंती उभा राहिल्या. या भिंती उभा करत असताना सुद्धा त्यांनी बकऱ्या विकून त्याचेही आलेले पैसे या घराच्या बांधकामास लावले परंतु त्याचे घराचे स्वप्न पूर्ण झाले नाही.
संतोष भोसले यांच्या घराचे स्वप्न अर्धवट राहिलेली कहाणी गेवराई येथील सामाजिक कार्यकर्ते कडुदास कांबळे यांनी मराठी फिल्म अभिनेत्री नभांगन फाउंडेशनच्या अध्यक्षा राजश्री देशपांडे यांच्या कानावर घातली. संतोष भोसले यांच्या चालू असलेल्या बांधकामास राजश्री देशपांडे यांनी त्यांचे संस्थेचे आर्किटेक यातींद्र यांना या बांधकामास भेट देऊन त्याचे घराचे काम पूर्ण करण्यास सांगितले.
नभांगन फाउंडेशनच्या सहकार्यामुळे संतोष भोसले यांच्या घराचे काम पूर्ण झालेले असून या पूर्ण झालेल्या बांधकामास नभांगन फाउंडेशनच्या अध्यक्षा मराठी फिल्म अभिनेत्री राजश्री देशपांडे, नभांगन फाउंडेशनचे आर्किटेक यातींद्र, महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समितीचे अध्यक्ष कडूदास कांबळे या सर्वांनी नुकतीच या घराला भेट दिली. यावेळी संतोष भोसले यांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. या घराचे पुढील सर्व काम पूर्ण करण्यासाठी राजश्री देशपांडे यांनी त्यांच्या टीमला सूचना दिल्या आहेत.