कोरोनापेक्षाही भयानक!या देशात खळबळ; ताप, रक्तस्त्राव अन् मृत्यू…
कोरोनाची भयावह स्थिती संपूर्ण जगाने जवळून पाहिली होती. त्याची धास्ती अजूनही कायम आहेच. मात्र त्यापेक्षाही एका भयानक आणि अज्ञात आजाराने खळबळ उडाली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या इक्वेटोरियल गिनीमध्ये अज्ञान आजार पसरलाय या आजारामुळे आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झालाय.
देशभऱ्यात या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जातेय. या देशाचे आरोग्य मंत्री मितोहा ओंडा ओ आयाकाबा यांनी शुक्रवारी सांगितले की, नमुने तपासण्यासाठी सरकार गतिशील आहे. तसेच रक्ताचे नमुनेसुद्धा शेजारील देश गॅबॉन येथे पाठवण्यात आले आहे.
रक्तस्त्रावामुळे झालेल्या मृत्यूनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने आतापर्यंत 200 लोकांना क्वारंटाईन केले आहे. आरोग्य मंत्री मितोहा ओंडो ओ आयाकाबा यांनी माहिती दिली आहे की, 7 फेब्रुवारी रोडी इक्वेटोरियल गिनीमध्ये प्रथमच अज्ञात आजारांची लागण झाल्याची नोंद झालीय. तसेच मृत्यूमुखी पडलेले लोक या अज्ञात आजाराने ग्रस्त लोकांच्या अंत्यविधीत सहभागी झाले होते ही बाब तपासानंतर उघडकीस आली.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, देशाच्या अधिकाऱ्यांनी संसर्गाशी थेट संबंध आलेल्या लोकांना दोन गावांमध्ये जाण्यास बंदी घातली आहे. तसेच संसर्ग पसरु नये म्हणून शासन उपाययोजनाही करतेय. माहितीनुसार जवळजवळ २०० लोकांना क्वारंटाइन करण्यात आलं असून या आजाराची विशिष्ट अशी लक्षणे अजून सांगण्यात आलेली नाही. मात्र मृत्यू झालेल्या रुग्णांना ताप, नाकातून रक्तस्त्राव, सांदेदुखी यांसारख्या समस्या असल्याचे पुढे आले आहे.
गेल्या महिन्यातही इक्वेटोरियल गिनीच्या सरकारी रेकॉर्डमध्ये की-एनटेम प्रांतातील न्सोके नसोमे जिल्ह्यात असामान्य आजारामुळे नऊ मृत्यू झाल्याचे दिसून आले. त्यातील एकाचा अज्ञात आजाराची संबंध नसल्याचे पुढे आले. WHO च्या एका प्रवक्त्याने सांगितले की, संघटना मृत्यूचे कारण शोधण्यासाठी नमुना चाचण्यांचे निरीक्षण करत आहे आणि त्याच्या ररिणामांची वाट बघत आहे.