बीड निष्क्रीय जिल्हाप्रशासन व नगरपरिषद धोरणाच्या निषेधार्थ “झोपा काढो आंदोलन
निष्क्रीय जिल्हाप्रशासन व नगरपरिषद धोरणाच्या निषेधार्थ “झोपा काढो आंदोलन
___
बीड जिल्हा पुरवठा विभागातुन ५००० रेशनकार्ड गायब, बालाघाटावरील डोंगर भागातील अवैध गौणखनिज उत्खनन, वनविभागातील गैरव्यवहार बीड शहरातील रखडलेले अमृत अटल
योजना व भुयारी गटार योजना तसेच बिंदुसरा व करपरा नदीपात्रातील अतिक्रमित बांधकाम, शहरातील बेकायदेशीर होर्डिग्ज व बॅनर आदि प्रकरणात वारंवार निवेदन तसेच आंदोलनानंतर सुद्धा जाणीवपूर्वक कारवाईस दुर्लक्ष केल्याबद्दल जिल्हाप्रशासन व नगरपरिषद प्रशासन धोरणाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.०६ फेब्रुवारी २०२३ वार सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी ” झोपा काढो आंदोलन “करण्यात आले यावेळी आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड, बीड जिल्हाध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती शेख युनुस च-हाटकर ,शेख मुबीन, तालुका सचिव शेख मुश्ताक, तालुका सहसचिव मिलिंद सरपते, बलभीम उबाळे, जिल्हाध्यक्ष आप अशोक येडे, बीड तालुकाध्यक्ष भिमराव कुटे, तालुका संघटक आप दत्तात्रेय सुरवसे, देवा गुंजाळ, प्रदिप औसरमल आदि सहभागी होते निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना निवेदन देण्यात आले.मागण्या:-
१)बीड जिल्हा पुरवठा विभागातुन ५००० रेशनकार्ड गायब प्रकरणात ९ महिन्यापासून वामन कदम उपायुक्त (पुरवठा)विभागीय कार्यालय औरंगाबाद यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन केवळ विभागीय चौकशीच्या नावाखाली ९ महिन्यापासून गुन्हे दाखल करण्यास जाणीवपुर्वक दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल जिल्हाधिकारी बीड, जिल्हा पुरवठा आधिकारी बीड, तहसिलदार बीड तसेच विभागीय चौकशी करणारे आधिकारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.२) बीड तालुक्यातील बालाघाटावरील डोंगर भागातील अवैध गौणखनिज उत्खनन प्रकरणात जबाबदार जिल्हा गौण खनिकर्म आधिकारी यांच्यावर शासनाचा महसुल बुडवून आर्थिक नुकसान केल्याबद्दल वसुलीची कारवाई करण्यात यावी तसेच जिल्हाधिकारी बीड यांच्यावर जबाबदार आधिकारी म्हणून कारवाई करण्यात यावी.
३) वनविभागातील कोट्यावधी रूपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करण्यास जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
४) बीड शहरातील बिंदुसरा तसेच करपरा नदीपात्रातील अतिक्रमित बांधकाम प्रकरणात जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याबद्दल नगरपरिषद प्रशासन तसेच संबधित कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी.
५) बीड शहरातील अमृत अटल योजना व भुयारी गटार योजना कित्येक वर्षांपासून रखडलेल्या असून संबधित प्रकरणात जबाबदार आधिका-यांवर कारवाई करण्यात येऊन योजना तात्काळ पुर्ण करण्यात याव्यात.
६) बीड शहरातील छत्रपती शिवाजीमहाराज चौक तसेच शासकीय विश्रामगृह तसेच नगररोड परीसरात विनापरवाना होडींग व बॅनर प्रकरणात संबधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी व कारवाई करण्यास कर्तव्यात कसूर केल्याबद्दल संबधित आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.