ताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

विद्युत कर्मचारी सहकारी पतसंस्थेवर दत्तात्रय गुट्टे यांचे निर्विवाद वर्चस्व…!


विद्युत कर्मचारी सहकारी पतसंस्थेवर दत्तात्रय गुट्टे यांचे निर्विवाद वर्चस्व…!विद्युत कर्मचारी सहकारी पतसंस्थच्या निवडणुकीत वैद्यनाथ परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार दणदणीत विजयी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी शहरातील विद्युत कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित परळी वैजनाथ सार्वत्रिक निवडणुकीत दत्तात्रय गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यनाथ परिवर्तन पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहे. पॅनलच्या ११ पैकी ११ उमेदवारांनी बाजी मारत विजय खेचून आणला. विजयी उमेदवारांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
विद्युत कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित परळी वैजनाथ सार्वत्रिक निवडणूक २०२३-२८ साठी निवडणूक झाली होती. या निवडणुकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात दोन पॅनलचे उमेदवार आपले भवितव्य आजमावत होते. दि ०४ फेब्रुवारी रोजी विद्युत कर्मचारी सहकारी पतसंस्था कार्यालय येथे २५३ मतदारापैकी २३९ सभासदांनी मतदानात सहभाग घेतला. सकाळी ८ ते ४ च्या दरम्यान मतदान होऊन सायंकाळी मतमोजणी होऊन यामध्ये दत्तात्रय गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यनाथ परिवर्तन पॅनलचे ११ पैकी ११ जागा वर दणदणीत विजय मिळवला आहे. वैद्यनाथ परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार विजयी यामध्ये गुट्टे दत्तात्रय दादाराव,बिडगर प्रदीप संभाजी, गित्ते बलीराम लक्ष्मण, मुंडे राजाभाऊ दत्तात्रय, कराड प्रदिप अंनंत ,फड हनुमंत श्रीराम, मुंडे ज्ञानोबा पंढरीनाथ, भांगे कांचना अशोक, मुंडे रंजना शिवदास, लोखंडे श्याम मधुकर, तावरे विजय शहादेव यांनी विजय संपादन केला आहे. या निवडणुकीत अत्यंत खेळीमळीच्या वातावरणात संपन्न झाली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून नितीन पंडित यांनी काम पहिले.या विजानंतर दत्तात्रय गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली पेढे वाटून व फटाके वाजवून जल्लोष व विजयोत्सव साजरा केला. या विजयाचे श्रेय दतात्रय गुट्टे यांनी संचालक मंडळाचा पारदर्शक कारभार, सर्व सभासद व सुज्ञ मतदार बंधू-भगिनींना दिले आहे. या विजयाबद्दल वैद्यनाथ परिवर्तन पॅनलचे प्रमुख दतात्रय गुट्टे व सहकाऱ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button