मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे अपक्ष उमेदवार आशिषआण्णा देशमुख यांनी बॉण्डवर दिला जाहीरनामा
मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे अपक्ष उमेदवार आशिषआण्णा देशमुख यांनी बॉण्डवर दिला जाहीरनामा
(प्रतिनिधी)ः- औरंगाबाद (मराठवाडा) शिक्षक मतदार संघ निवडणूक 2023 चे वारे जोमाने वाहत असतांना निवडणूकीच्या मैदानात उतरलेले सर्व उमेदवारांच्या मध्ये वयाने अतिशय तरुण असलेले धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते शिक्षक बांधवांसाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरुन संघर्ष करणारे उमेदवार आशिष (आण्णा) अशोक देशमुख यांनी मतदारांना आवाहन करत आपला जाहीरनामा स्टॅम्प पेपरवर जाहीर केला आहे.
त्यात त्यांनी जो पर्यंत महाराष्ट्र शासन शिक्षकांची जुनी पेन्शन योजना चालू करत नाही तो पर्यंत आपण शिक्षक आमदार म्हणून निवडून आल्यास पेन्शन व इतर भत्ते स्विकारणार नाही असे सांगितले आहे. तसेच होय, मी शब्द देतोय! अशी भावनीक साद घालून निवडून आल्यास शिक्षकांच्या प्रश्नावर प्रामाणिकपणे काम करण्यास कटीबध्द राहील असे अभिवचन शिक्षक बंधू-भगिनींना दिले आहे. त्यामध्ये आर.टी.ई.ची थकीत रक्कम त्वरीत मिळावी, राज्याचे शिक्षणावरील बजेट वाढविण्यात यावे, शाळा, महाविद्यालयातील रिक्तपदे भरणार, तासिक तत्त्वावरील शिक्षकांना सन्मानजनक मानधन मिळवून देणार तसेच शिक्षकांचा जीवन वीमा काढणार इत्यादीची जबाबदारी घेतो असे अभिवचन देवून त्यांच्या मत पत्रिकेवरील अनुक्रमांक 6 आशिष (आण्णा) अशोक देशमुख या नावा समोरील रकान्यामध्ये पसंती क्र. 1 नोंदवून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. शिक्षक बंधू-भगिनींमध्ये या जाहीरनाम्याची चर्चा संपूर्ण मराठवाड्यात होतांना दिसत आहे.