जालना ते तिरुपती बालाजी ही साप्ताहिक रेल्वे गाडी सुरू
जालना ते तिरुपती बालाजी ही साप्ताहिक रेल्वे गाडी सुरू झाली असून, या गाडीला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी शुभारंभाचा हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.
त्या रेल्वेमुळे आता जालनाकरांना तिरुपती बालाजीला जाणे सुलभ होणार आहे. या रेल्वे जालना मार्गे परळी, बिदर, हुमनाबाद, रायचूर आणि तिरुपती अशी धावणार आहे. सुरुवातीला ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या महिन्यात सहा फेर्यांसाठी जालना येथून रविवारी 11.50 वा. व सोमवारी 09.05 वा. ही रेल्वे गाडी तिरुपतीला पोहोचणार आहे. परतीच्या दिशेने सदर रेल्वे गाडी मंगळवारी 18.30 वा. सुटेल आणि बुधवारी 18.00 वा. जालना येथे पोहोचणार आहे. ही रेल्वे सुरू होण्यापूर्वी मराठवाडा विभागातून तिरुपतीपर्यंत चार वेगवेगळ्या दिवशी साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत, मात्र प्रवाशाची वाढती संख्या पाहता या भागातून जादा रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी होत होती.
✍️✍️हे ही वाचा
लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
नवगण न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !