बीड आतून दरवाजा लावून गळफास घेऊन आत्महत्या
बीडच्या धांडे नगर रोडवरील शिवश्रुष्टी नगरमध्ये साईनाथ बाबासाहेब तांदळे वय 22 वर्षे याने भाड्याच्या घरात आतून दरवाजा लावून गळफास घेऊन आत्महत्या केली.
बीड : बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत 22 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. बीडच्या धांडे नगर रोडवरील शिवश्रुष्टी नगरमध्ये साईनाथ बाबासाहेब तांदळे वय 22 वर्षे याने भाड्याच्या घरात आतून दरवाजा लावून गळफास घेऊन आत्महत्या केली. हा तरुण एका खाजगी रुग्णालयामध्ये काम करत होता.
साईनाथ बाबासाहेब तांदळे याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. त्याच्या आत्महत्येची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी करत आहेत. पोलिसांनी अद्याप कोणत्याच गोष्टीचा उलगडा केलेला नाही.
✍️✍️हे ही वाचा
लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
नवगण न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !