क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे
साडेबाराव्या वर्षात लग्न,14 व्या वर्षी गरोदर
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दऱ्याचे वडगाव येथे एक धक्कादाय घटना समोर आली आहे.अवघ्या 14 वर्षांच्या मुलीशी लग्न करत गरोदर केल्याची घटना घडली
कोल्हापूर जिल्ह्यातील दऱ्याचे वडगाव येथे एक धक्कादाय घटना समोर आली आहे. अवघ्या 14 वर्षांच्या मुलीशी लग्न करत गरोदर केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान तिचे अवघ्या साडेबाराव्या वर्षात लग्न झाल्याचेही उघड झाले आहे. या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यात शाहू महाराजांनी घालून दिलेल्या शिकवणींना गालबोट लागत असल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी वेळी डॉक्टरांना शंका आल्याने त्यांनी अधिक तपासणी केली. यावरून बालविवाहाचा प्रकार उघड झाला आहे. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अल्पवयीन मुलीचा नवरा, आई, वडिलांसह पाच जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.