व्हिडिओ न्युज

Video: धक्कादायक…! फोनवर बोलतानाच अचानक कोसळला, मित्रासमोरच गेला जीव, घटना कॅमेऱ्यात कैद!


सोशल मीडियावर आपल्याला जगभरातील घटना काही क्षणात कळतात. मग अनेकदा घडून गेलेल्या घटनांचे धक्कादायक सर्व प्रसंग आपल्याला व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्यास मिळतात.

मग कुठे संपूर्ण इमारत कोसळण्याचा व्हिडिओ असतो तर कधी कोणत्या व्यक्तीचा अपघाती मृत्यूचा व्हिडिओ असतो. मात्र सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे. त्याची संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे.

 

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला एका दुकानात पाच व्यक्ती बसलेले दिसत आहे. मात्र सर्व व्हिडिओत दिसणारे व्यक्ती मित्र आहेत. जे दुकानात निवांत गप्पा मारत बसलेले आहेत. सर्वांच्या गप्पा सुरु असताच तो पर्यंत त्यांच्यामधील एक तरुण जोरात जमिनीवर कोसळतो. त्यानंतर त्याचे मित्र घाबरुन त्याला उचलतात आणि मग त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात. सर्व प्रसंग दुकानातील सीसीटीव्हीमध्ये(CCTV) कैद झालेला आहे.

व्हिडिओ येथे पहा

सर्व घटना मध्य प्रदेशमधील असल्याचे समजते. मात्र सध्या या घटनेचा व्हिडिओ एक्सवरील ”@vinaysaxenaj” या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये ”मध्य प्रदेशातील रेवा येथे मित्रांसोबत हसत-खेळत बोलत असताना अचानक एक तरुण खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला” असे कॅप्शन देण्यात दिलेले आहे.

 

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button