व्हिडिओ न्युज

Video थोडक्यात बचावला 185 लोकांचा जीव, बेंगळुरू-कोची विमानाला आग; पाहा व्हिडिओ


एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे बेंगळुरू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानाने बेंगळुरू विमानतळावरून नुकतेच उड्डाण घेतले असता इंजिनला आग लागली, त्यामुळे प्रवाशांमध्ये भीती पसरली.

विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने क्रू मेंबर्सशी संपर्क साधला आणि विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले. लँडिंग होताच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

दरम्यान, प्रवासी आणि क्रू मेंबर्सना विमानातून उतरवून सुरक्षित स्थळी नेण्यात आले. विमानात 179 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते, ते सुरक्षित आहेत.

फ्लाइट IX 1132 ने कोचीसाठी उड्डाण केले. रात्री 11.15 च्या सुमारास हा अपघात झाला. बेंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या प्रवक्त्याने या घटनेची पुष्टी केली आणि परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत.

Soan Papdi: बाबा रामदेव यांना आणखी एक धक्का! पतंजलीची सोनपापडी निकृष्ट, तिघांना तुरुंगवास

एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमानाने उड्डाण करताच विमानाच्या इंजिनला आग लागली. या घटनेकडे वेळेत लक्ष गेल्याने पायलट ॲक्शन मोडमध्ये आला. त्याने तातडीने विमानतळ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ आपत्कालीन लँडिंगची व्यवस्था करण्यात आली. ॲम्ब्युलन्स, अग्निशमन दल आणि विमानतळाचे कर्मचारी विमान उतरण्यापूर्वी धावपट्टीवर पोहोचले होते. लँडिंग होताच अग्निशमन दलाने आग विझवण्यास सुरुवात केली.

कर्मचाऱ्यांनी प्रवाशांची आणि क्रू मेंबर्सची सुटका केली. त्यानंतर प्रत्येक प्रवाशाची आरोग्य तपासणी करण्यात आली.

दरम्यान ही आग विमानाच्या इंजिनच्या उजव्या बाजूला लागली होती. लँडिंग करताना ग्राउंड सर्व्हिस कर्मचाऱ्यांनाही इंजिनमध्ये आग लागल्याचे दिसले. इंजिनला अचानक आग लागण्याचे कारण अद्याप समोर आले नसले तरी या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रवाशांना दुसऱ्या विमानाने कोचीला पाठवण्यात आले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button