पंतप्रधान नरेंद्र मोदी राजे असून, देशात पोलिसांचे राज्य – राहुल गांधी
नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडी चौकशी सुरु आहे.याविरोधात काँग्रेसकडून (Congress) देशभरात आंदोलन केले जात आहे. राजधानी दिल्लीमधील आंदोलनात सहभागी झालेले राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. त्यांना पोलिसांनी आधी घेरले
नंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. याआधी २१ जुलैला ईडीने सोनिया गांधींची दोन तास चौकशी झाली होती.
‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात गेल्या महिन्यात राहुल गांधी यांच्यानंतर सोनिया गांधी यांना ‘ईडी’ने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांची चौकशी लांबली होती. राहुल गांधी राजपथ मार्गावर रस्त्यावर बसून आंदोलन करत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना घेरले. तपास यंत्रणांकडून विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याविरोधात तसेच महागाई, जीएसटी अशा अनेक मुद्द्यांवर राहुल यांनी आंदोलन केले. रस्त्यावर बसुन जवळपास राहुल गांधी अर्धा तास आंदोलन करत होते. यानंतर पोलिसांनी त्यांना उचलून ताब्यात घेतले व इतर नेत्यांसोबत बसमधून नेले.
यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजे असून, देशात पोलिसांचे राज्य आहे, अशी टीका केली.