एक मराठा लाख मराठा चित्रपटात आहे काय?
एक व्यक्ती समाज बदलू शकतो का? कदाचित याचं उत्तर देणे कठीण होईल. परंतु एका व्यक्तीसाठी लाखोंचा जनसमुदाय एकटवला तर मात्र चित्र बदलू शकते. अशाच प्रकारचा विषय सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावातील गणेश शिंदे या उमद्या तरुणाने एक मराठा लाख मराठा या मराठी चित्रपटातून मांडला आहे.
गणेश सिनेमाबद्दल सांगतात की, एक मराठा लाख मराठा हा सिनेमा म्हणजे मराठी माणसाची व्यथा आहे. शेतकरी कुटुंबात राहणाऱ्या एका तरुणाची ही कथा आहे. आपल्या बहिणीवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी व तिला न्याय मिळवून देण्यासाठी तो स्वतः एकटा संघर्ष करतो. त्याच्या संघर्षाचे रूपांतर मोठ्या मोर्चा मध्ये कसे होते ते त्यालाही कळत नाही. आता त्याच्या आयुष्यात एकच लक्ष्य असते ते म्हणजे आपल्या बहिणीला न्याय मिळवून देणे. यात तो यशस्वी होतो का? त्याचे पुढे काय होते यासाठी तुम्हाला एक मराठा लाख मराठा हा सिनेमा बघावा लागेल.
चित्रपट पहा👇👇👇👇
सैजन्य युटुब
सिनेमात मिलिंद गुणाजी, भारत गणेशपुरे, किशोर कदम, मोहन जोशी, विद्याधर जोशी, अरुण नलावडे, संजय खापरे, नागेश भोसले, विजय पाटकर, प्रिया बेर्डे, सुरेखा कुडची, उषा नाईक, नफिसा शेख, ढोले गुरुजी, भक्ती चव्हाण, राधिका पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाला संजय साळुंखे, अतुल लोहार आणि गणेश सातोर्डेकर यांचे संगीत लाभले आहे.