आमदार ढसाढसा रडला. ‘त्यांच्या’ हातून मरण्यापेक्षा मी जीवन संपवेल. धमकी आलेल्या आमदाराची उद्विग्न प्रतिक्रिया.
त्र्यंबकेश्वर : हिरामण खोसकर म्हणाले, आम्हाला महाविकास आघाडीचे काम करण्याचे वरुण आदेश आले आहे. मी आमदार असल्याने मी प्रमुख आहे. त्यामुळे मला काम करावे लागणार आहे. याशिवाय देविदास पिंगळे माजी खासदार आहे त्यांचे काम मी आमदार नव्हतो तेव्हापासून करत आलो आहे.
मी माझं काम करतो आहे. शिवाजी चुंभळे आणि त्यांचा मुलगा अजिंक्य चुंभळे यांनी मला 10 वेळेस फोन केले आहे. मला धमक्या दिल्या. देविदास पिंगळे यांचे काम करू नको, त्यांच्या व्यासपिठावर जाऊ नको म्हणून सांगितले, नाहीतर पाहून घेईल असा फोन आला होता.
त्यांचे वारंवार फोन येत असल्याने मी त्यांना ब्लॉक केले होते. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या नंबर वरुण मला फोन केला आणि ब्लॉक केले म्हणून सांगत आमच्या नादाला लागू नको, महागात पडेल अशी धमकी दिली. पैसे लावून तुम्हाला निवडणुकीत पाडू असं म्हणतात असाही आरोप खोसकर यांनी केला आहे.
बघून घेऊ अस म्हणत धमकी देतात. मला शेती पोती आहे. मला इलेक्शन नाही करायचे, मी शेती करेल. पण पैसे वाल्यानी कशीही दादागिरी करायची हे चुकीचे आहे. यांच्या हातून मरण्यापेक्षा मी आत्महत्या करून घेईल अशी रडत रडत प्रतिक्रिया खोसकर यांनी दिली आहे.
हिरामण खोसकर यांनी गरिबाने राजकारण करायचं नाही का ? असे म्हणत उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. हिरामण खोसकर यांनी केलेल्या या आरोपावरुन राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
हिरामण खोसकर हे इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघाचे आमदार आहे. ते सध्या माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या नेतृत्वात असलेल्या महाविकास आघाडीच्या पॅनलचे काम करत आहे. त्यावरूनच हे संपूर्ण प्रकरण घडले असून पुढील काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.