शिक्रापूरच्या बँकेतून ग्राहकाचे सहा लाख गायब..
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका बँकेमध्ये एका टाकलेले तब्बल 5 लाख 97 हजार रुपये अचानक गायब झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे याबाबत अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंडस्लंड बँकेच्या बँक खात्यावर सनसवाडी येथील किराणा दुकानदार नारायणलाल देवासी यांच्या जमीन विक्रीतून आलेले 5 लाख 97 हजार 138 रुपये ठेवलेले होते. देवासी यांना त्यांच्या दुकानाच्या मालासाठी व्यापाऱ्याला पैसे पाठवायचे असल्याने त्यांनी मोबाईल वरुन पैसे पाठवण्यासाठी प्रयत्न केला असता त्यांच्या बँक खात्यावर फक्त 138 रुपये असल्याचे तसेच 5 लाख 97 हजार रुपये गायब झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी बँकेत जाऊन खात्याबाबत चौकशी केली असता बँकेतून वेगवेगळ्या ठिकाणच्या बँक खात्यांवर तब्बल 5 लाख 97 हजार रुपये ट्रान्स्फर झाल्याचे दिसून आले.
त्यामुळे आपली बँकेतून फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने नारायणलाल पकाराम देवासी (वय ४२) रा. भुजबळ वस्ती सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर करत आहे.
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !