क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

Video:अमृतपालच्या मुख्य सहकाऱ्याच्या आवळल्या मुसक्या..


खलिस्तानी समर्थक आणि वारिस दे पंजाबचा प्रमुख अमृतपाल सिंह याला आज मोठा झटका बसला आहे. पंजाब पोलिसांना त्याचा उजवा हात असलेल्या प्रमुख सहकाऱ्याला ताब्यात घेतलं आहे.
पंजाब पोलिसांनी सरहिंद येथे जोगा सिंह याला ताब्यात घेतलं. डीआयजी नरिंदर भार्गव यांनी माध्यमांना ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, आज अमृतपाल सिंग याचा प्रमुख सहकारी जोगा सिंह याला सरहिंद येथून ताब्यात घेतलं आहे. हा तो व्यक्ती आहे ज्याने अमृतपाल फरार झाल्यांतर १८ मार्च रोजी त्याला आसरा दिला होता. 

यापूर्वी खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंहप्रकरणात पोलिसांनी त्याचा सहकारी पपलप्रीत सिंह याला दिल्लीतून उचललं होतं. दिल्लीच्या स्पेशन सेल टीमने पपलप्रीत सिंह याला पंजाब आणि दिल्ली पोलिसांच्या ज्वाइंट ऑपरेशनमध्ये ताब्यात घेतलं होतं. पपलप्रीत याचे थेट आयएसआयशी संबंध असल्याचं उघड झालं होतं.

पंजाब पोलिसांनी १८ मार्च रोजी खलिस्तान समर्थक आणि त्यांच्या साथीदारांवर कारवाई सुरू केल्यापासून अमृतपाल आणि पपलप्रीत फरार होता. अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवणे, खुनाचा प्रयत्न, पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे आणि सरकारी अधिकाऱ्यांना कर्तव्य बजावण्यात अडथळा आणणे यासह विविध कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button