ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

“शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल, ता. येवला, जि. नाशिक यांचे वतीने भव्य राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन” .


“शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल, ता. येवला, जि. नाशिक यांचे वतीने भव्य राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन” 

महाराष्ट्र : शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल, ता. येवला, जि. नाशिक आयोजित शहादू शिवाजी वाघ यांच्या स्मृती पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने दि. ०४ जून २०२३ रोजी भव्य राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. राज्यभरातील जास्तीत जास्त कवींनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा संजय शहादू वाघ यांनी केले आहे.

स्पर्धेचे नियम व अटी पुढील प्रमाणे

१. काव्यवाचन स्पर्धेची नाव नोंदणी दि. १ एप्रिल २०२३ पासून १५ एप्रिल २०२३ पर्यंत [email protected] या ईमेल वर पुर्ण नाव आणि सादरीकरणासाठी निवडलेली फक्त एकच कविता पाठवून नोंदणी करावी. वेळेच्या आधी आणि वेळेच्या नंतर आलेली कविता ग्राह्य धरल्या जाणार नाही. ईमेल प्राप्त झाल्यावर संबंधित कवीला कळविण्यात येईल.
२. काव्यवाचन स्पर्धा दि. ०४ जून २०२३ रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत फक्त पहिल्या सत्रात होणार आहे.
३. नोंदणीसाठी कविता टेक्स्ट मेसेज स्वरूपात पाठवावी. पीडीएफ, जेपीजी, अथवा फोटो टाईपमध्ये पाठवू नये
४. कविता एकदा पाठवल्यास दुरूस्ती करून पुन्हा पाठवू नये अथवा दोन कविता पाठवू नये असे केल्यास त्या स्पर्धकाला संधी दिली जाणार नाही, नंबर बाद केला जाईल
५. नोंदणी प्राप्त पहिल्या तीस (३०) कवींना या स्पर्धेत प्रथम प्राधान्य दिले जाईल. जे कवी नाव नोंदणी करूनही वेळेत आलेले नसतील तर त्यांच्या जागी पुढील कवीला प्राधान्य देण्यात येईल तसेच ऐनवेळी आलेल्या कवींना वेळ मिळाल्यास संधी दिली जाईल.
६. प्रत्येक कवीला स्वरचित एकच कविता सादर करावी लागेल. कवितेला प्रस्तावना देता येणार नाही, फक्त आपले नाव व कवितेचे शीर्षक सांगून कविता सादर करावी लागेल.
७. कविता कमीत कमी १६ ओळी व जास्तीत जास्त २० ओळींची असावी.
८. स्पर्धेला येतांना नावनोंदणी वेळी जी कविता दिली आहे फक्त त्याच कवितेच्या टंकलिखित केलेल्या चार प्रती आणाव्यात. कवितेच्या खाली स्वलिखीत असल्याची व काही आक्षेप आल्यास सर्वस्वी स्वतः जबाबदार असल्याची टीप टाकून आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता व संपर्क क्रमांक टाकावा.
९. जातीयवादी, राजकीय विडंबन, दोन जातीधर्मात तेढ निर्माण करणा-या, व्यक्ती चारित्र्यहनन करणा-या कविता बाद केल्या जातील.
१०. काव्यवाचन स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
११. येणा-या प्रत्येक कवीला सकाळी चहा-नाष्टा, दुपारी जेवण विनामुल्य दिले जाईल कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
१२. लांबच्या अंतरावरून येणा-या कवींना मुक्कामाची व जेवणाची व्यवस्था केली जाईल. त्यांनी दोन दिवस आधी आपली निश्चिती कळवावी. महिलांसाठी विशेष व्यवस्था केली जाईल.
१३. येणा-या कोणत्याही कवीला प्रवास खर्च दिला जाणार नाही. स्वखर्चाने यावे लागेल.
१४. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

पुरस्काराचे स्वरूप

काव्यवाचन स्पर्धेचा निकाल आणि पुरस्कार वितरण त्याच दिवशी दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत होईल.
काव्यवाचन स्पर्धेचे क्रमांक व पुरस्कार पुढीलप्रमाणे असतील –
🥇 प्रथम (एक) रु. १००१/- + सन्मानचिन्ह + मानाचे वस्र+ प्रमाणपत्र
🥈 व्दितीय (एक) रु. ७५१/- + सन्मानचिन्ह + मानाचे वस्र+ प्रमाणपत्र
🥉 तृतीय- (एक) रु. ५५१/- + सन्मानचिन्ह + मानाचे वस्र + प्रमाणपत्र
🎖️ उत्तेजनार्थ (दोन) – प्रत्येकी २५१/- + सन्मानचिन्ह + मानाचे वस्र +प्रमाणपत्र


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button