बच्चू कडू लोकांच्या मनातलं बोलले, आमदारांनी पेन्शन घ्यावी का?
अमरावती : गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. आता आपल्या या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या या संपावर आता आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार, खासदारांनीसुद्धा आपली पेन्शन सोडली पाहिजे म्हणजे कर्मचारी पेन्शन मागणार नाही असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. तसेच मी सुद्धा पेन्शन घेणार नसल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. बच्चू कडू यांनी नेमकं काय म्हटलं? राज्यात जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे.
यावर आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. आमदार, खासदारांनी सुद्धा आपली पेन्शन सोडली पाहिजे, म्हणजे कर्मचारी पेन्शन मागणार नाही असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. मी सुद्धा पेन्शन घेणार नाही. कोणाला किती पेन्शन दिली पाहिजे याचं लिमिट असलं पाहिजे. कामावर आधारित मूल्यांकन करून पेन्शन दिली पाहिजे, समान न्याय धोरण सरकारने आणावं.
शेतकरी आणि शेतमजुरांच्या पेन्शनचा देखील सरकारने विचार केला पाहिजे असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. जुन्या पेन्शनचा मुद्दा हाय कोर्टात जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. आज सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिसरा दिवस आहे.
सरकारकडून देखील हा संप मागे घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र संप अजूनही सुरूच आहे. आता हे प्रकरण हाय कोर्टात पोहोचलं आहे. ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.