ताज्या बातम्या

साप किती वर्षापर्यंत जगतो? कधी विचार केलाय


मुंबई: साप हा सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. कारण त्याच्या फक्त एका दंशाना माणसाला पॅरालिसीस होऊ शकतो. तर काही सापांचं विष इतकं विषारी असतं की माणसाचा मृत्यू देखील होतो  तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगभरात दरवर्षी सरासरी 1,38,000 लोक सापांमुळे मरतात. सिंह, बिबट्या किंवा हत्ती सारखा प्राण्यांमुळे मारल्या गेलेल्या लोकांपेक्षा सापामुळे जीव गेलेल्या लोकांची संख्या सर्वाधीक आहे. कारण माणसाला मारण्यासाठी सापाचा एक विषाचा थेंब देखील पुरेसा असतो. जगातील सर्वात धोकादायक सापांमध्ये इनलँड तैपन, ब्लॅक मांबा, रसेल वाइपर, किंग कोब्रा, ईस्टर्न ब्राउन स्नेक या प्रजातींचा समावेश आहे.



पण तुम्ही कधी असा विचार केलाय का की साप किती वर्षापर्यंत जगतात? जगभरात असे बरेच लोक आहेत ज्यांना सापाचे जास्तीत जास्त वय जाणून घ्यायचे आहे. या अनुषंगाने आज आम्ही तुम्हाला सापाच्या कमाल वयाबद्दल सांगणार आहोत.

बंदिवासात राहणारे साप जंगलात राहणाऱ्या सापांपेक्षा जास्त काळ जगतात तसे पाहाता सापांच्या वेगवेगळ्या जाती प्रमाने त्याचे वयही बदलते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जंगलात मुक्तपणे राहणाऱ्या सापांचे आयुष्य कमी असते. तर प्राणीसंग्रहालयात किंवा इतर कोणत्याही प्रकारे बंदिवासात राहणाऱ्या सापांचे आयुष्य जास्त असते. च्या अहवालानुसार, बंदिवासात राहणाऱ्या सापांचे सरासरी वय 13 ते 18 वर्षे असते, तर जंगलात राहणाऱ्या सापांचे सरासरी वय केवळ 10 ते 15 वर्षे असते.

अहवालानुसार, इतर सापांच्या तुलनेत बॉल पायथन प्रजातीचे साप सर्वात जास्त आयुष्य जगतात. बॉल पायथन प्रजातीचे साप कैदेत असताना 25 ते 30 वर्षे जगू शकतात. रिपोर्टनुसार, गॅरी नावाचा बॉल पायथन साप 42 वर्षे जगला. हा साप एका महिलेने पाळला होता. अहवालात असे म्हटले आहे की, गॅरीशिवाय जगातील एकही साप इतकी वर्षे जिवंत राहिलेला नाही.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button