ताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऑफिस बॉयच निघाला चोर; पाऊणे दोन लाख केले लंपास


चंद्रपूर : शहरातील कमला नेहरू कॉम्प्लेक्स मधील होलसेल लिकर व्यावसायिक खुशाल भागचंद अडवाणी यांच्या कार्यालयाच्या आलमारीतून १ लाख ८६ हजार ५५० रुपये कार्यालयातील ऑफिय बॉयनेच चोरल्याचा प्रकार शहर पोलिसांनी २४ तासात उघडकीस आणलायाप्रकरणी पोलिसांनी हर्षानंद लखाराम पाल (३६) रा. सिंधी कॉलनी याला अटक करुन दुचाकी वाहनासह २ लाख २१ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. खुशाल अडवाणी याने आपल्या कार्यालयातील आलमारीत १ लाख ८६ हजार ५५० रुपये ठेवले होते. मात्र दोन दिवसानंतर ते रुपये तेथे दिसून आले नाही.त्यांनी लगेच शहर पोलिस स्टेशन गाठून यासंदर्भात तक्रार दिली. पोलिसांनी कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंद केला. गुन्हे अन्वेषण पथकाचे सपोनि मंगेश भोंगाडे यांच्या नेतृत्वात पोलिस पथकांनी खुशाल अडवाणी यांच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली. यावेळी कामावरील लेखापाल, संगणक ऑपरेटर, ऑफिस बॉय अशा पाच व्यक्तीचे बयाण नोंदविले. ऑफिस बाॅयचे बयाण संशयित वाटताच त्याची कसून चौकशी करत पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला.

पोलिसांनी ऑफिस बाॅय हर्षानंद लखाराम पाल याला अटक करुन गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व मुद्देमाल असा एकूण २ लाख २१ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीशसिंह राजपूत यांच्या नेतृत्वात सपोनि अतुल स्थूल गुन्हे अन्वेषण पथकाचे सपोनि मंगेश भोंगाडे, पोउनि संदीप बच्चीरे, सफो शरीफ शेख, पोहवा विलास निकोडे आदींनी केली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button