ताज्या बातम्यादेश-विदेशबीडमहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

बीड गॅस सिलेंडर दरवाढीच्या निषेधार्थ व कांद्याला हमीभाव मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “चुलीवर कांदाभजी आंदोलन


बीड : मोदी सरकारने महिलांच्या डोळ्यात चुलीचा धुर जाऊ नये म्हणून “उज्वला गॅस “योजनेचा गवगवा केला परंतु निरंतर वाढत चाललेल्या गॅस दरवाढीमुळे पुन्हा चुली पेटवण्याची वेळ आली असून याच्या निषेधार्थ व दरवाढ कमी करण्यात यावी व नाफेड द्वारे खरेदी सुरू करून प्रतिक्विंटल २५०० रूपये कांद्याला हमीभाव द्यावा या मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.०६ मार्च सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर कांदाभजी तळुन “चुलीवर कांदाभजी आंदोलन “करण्यात आले.

या आंदोलनात रामनाथ खोड, किस्किंदाताई पांचाळ, सय्यद सालिहा, शेख युनुस, मिलिंद सरपते, बलभीम उबाळे, शेख मुबीन, शेख मुस्ताक, रमाकांत रेवणवार आदि सहभागी होते. निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधान सचिव यांना देण्यात आले.

सविस्तर माहीतीस्तव

शासनाने स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर ५० रूपये तर व्यावसायिक सिलेंडर ३५० रूपयांनी दरवाढ केली असून अगोदरच पेट्रोल, डिझेल आदिंच्या वाढलेल्या किमतीमुळे जनता त्रस्त असुन सर्वच जीवनावश्यक वस्तुंमध्ये दरवाढ होऊन महागाई वाढणार असुन सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल होणार असून दरवाढ रद्द करण्यात यावी.

कांद्याचे भाव गडगडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून दुष्काळी भागातील नगदी पिक म्हणून कांद्याची मोठ्याप्रमाणात लागवड केली जाते. कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल होणार असून दरवाढ रद्द करण्यात यावी.

कांद्याचे भाव गडगडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून दुष्काळी भागातील नगदी पिक म्हणून कांद्याची मोठ्याप्रमाणात लागवड केली जाते. कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून कांद्याची नाफेड कडुन २५०० रूपये प्रतिक्विंटल खरेदी करण्यात यावी तसेच शेतक-यांना २५ हजार रूपये हेक्टरी अनुदान देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button