ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आजपासून OnePlus च्या ‘या’ स्मार्टफोनच्या विक्रीला सुरुवात, मिळणार जबरदस्त फीचर्स


One plus ही एक मोबाईल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन ही कंपनी सातत्याने लॉन्च करत असते. एकच कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला २ फ्लॅगशिप स्मार्टफोन्स Oneplus 11 5G आणि OnePlus 11R 5G लॉन्च केले आहेत.
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर आजपासून OnePlus 11R या फोनच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. कंपनीने हा फोन दोन प्रकारांमध्ये लॉन्च केला होता ज्यामध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन 8th जनरेशन प्लस वनचा सपोर्ट मिळतो.



काय आहेत फीचर्स ?

या स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा इंचाचा एफएचडी+ डिस्प्ले येतो. हे डिव्हाईस स्नॅपड्रॅगन 8+ जनरल 1 प्रोसेसरद्वारे संलग्न आहे. यात १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटर्नल स्टोरेज येते. या स्मार्टफोनचा कॅमेरा ५० प्लस १२प्लस २ मेगापिक्सलचा कॅमेरा येतो. ट्रिपल रियर कॅमेरा येतो. तसेच सेल्फी कॅमेरा १६ मेगापिक्सलचा कॅमेरा येतो. तसेच या डिव्हाइसमध्ये १०० वॅटचे चार्जिंग सपोर्ट येतो. या स्मार्टफोनच्या बॅटरीची क्षमता ५,००० mAh इतकी आहे.

मिळतेय खास ऑफर

हा स्मार्टफोन तुम्ही Amazon आणि OnePlus चॅनेलद्वारे खरेदी करू शकता. ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर या स्मार्टफोनवर तुम्हाला १,००० रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. तसेच तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊन फोन अजून कमी किंमतीत खरेदी करू शकता. तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीमध्ये असल्यास तुमचे ५ ते ८ हजार रुपये नक्कीच वाचू शकतील. जर तुम्हाला १,००० रुपयांचा डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरमधील ८,००० रुपये अशी सूट मिळाली तर तुम्ही OnePlus 11R 5G हा फोन केवळ ३०,००० रुपयांना खरेदी करू शकता.

काय आहे किंमत ?

OnePlus 11R च्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ही ३९,९९९ रुपये इतकी आहे. तसेच १६ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या टॉप व्हेरिएंटची किंमत ही ४४,९९९ रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन तुम्ही Galactic Silver आणि Sonic Black या रंगांमध्ये खरेदी करू शकता.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button